मुंबई: ज्या गृहखात्यासाठी सुरवातीपासून तिढा सुरु होता. ते खातं अखेर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला मिळालेले नाही. मग तिढा का कायम ठेवला असा सवाल आता उपस्थित होत आहे. शिंदे यांचे तेलही गेले तुपही गेले हाती आले धुपाटणे अशी अवस्था झालेली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालेले असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महायुती सराकरमध्ये मंत्र्यांचा शपथविधीही झाला आहे. परंतु खातेवाटप झाले नव्हते. त्यामुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बिनखात्याचे मंत्री होते.
हेही पहा एकदा... सरकारी वाहने धूळखात पडून....
हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अखेर मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असेलल्या भाजपच्या १९, शिंदेंच्या ११ आणि अजितदादांच्या ९ मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. यामध्ये महायुतीत ज्यावरुन नाराजी नाट्य रंगलं होते. ते गृहखातं फडणवीसांनी आपल्याकडेच ठेवले आहे.
महायुती सरकारच्या सत्तास्थापनेला उशीर झाला तो या गृहखात्यामुळेच. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृहखात्याची मागणी केली होती. पण, यासाठी भाजप तयार नव्हते. गृहखात्यासाठी शिंदेही अडून बसले होते.
हेही वाचा अन् क्लिक करा ः पिचकाऱ्यांनी भिंती रंगल्या...
ज्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आपल्या पदाची शपथ घेतली, त्याच्या काही तासांपूर्वीपर्यंत शिंदे शपथ घेणार की नाही हे ठरलेलं नव्हतं, ते या गृहखात्यामुळेच. पण, अखेर ते गृहखातं फडणवीसांनी आपल्याकडेच ठेवले आहे.
ही मिळाली खाती... उदय सांमत - उद्योग व मराठी भाषा, प्रताप सरनाईक - वाहतूक, शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय, भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकास, प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, दादा भूसे - शालेय शिक्षण, गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा, संजय राठोड - मृदा व जलसंधारण, संजय शिरसाट - सामाजिक न्याय.
Post a Comment