टेम्पोच्या धडकेत तीन मुलगा ठार..

अहिल्यानगर ः पुण्याहून - अहिल्यानगरकडे भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने रस्ता ओलांडण्याकरिता रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिलेस धडक दिल्याने महिलेच्या हातातील तीन वर्षाचा मुलगा खाली पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर पुणे रोडवरील केडगाव इंडस्ट्रियल एरिया जवळ रॉयल बुलेट शोरूम समोर मंगळवारी (दि.३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. स्वराज संभाजी महारनवर (वय ३) असे मयत बालकाचे नाव आहे.


याबाबत संभाजी रामदास महारनवर (रा. शिक्षक कॉलनी, मोहिनीनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वाहन चालक शंकर उर्फ शेखर राघू मोरे, क्लीनर चंद्रकांत दत्तात्रय जपकर (दोघे रा. नेप्ती, ता.) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना वाहनासह ताब्यात घेतले आहे. हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे.

फिर्यादी संभाजी हे रेल्वे स्टेशन वर हमाली काम करतात तर त्यांची पत्नी कल्याणी महारनवर ही तिच्या तीन वर्षाच्या लहान मुलास घेऊन केडगाव इंडस्ट्रियल एरिया येथील कंपनीत कामाला जाते. मंगळवारी (दि.३) संध्याकाळी काम सुटल्यानंतर ती महिला तिच्या समावेश असलेल्या मनीषा येळमकर, कविता लोखंडे, योगेश लोखंडे, राणी आंधळे, सुषमा येवले (सर्व रा.केडगाव) यांच्यासह घरी जाण्याकरिता निघाल्या.

त्या केडगाव इंडस्ट्रियल  एरिया बाहेर आल्या व रस्ता ओलंडण्याकरिता रॉयल एनफिल्ड शोरूम च्या समोरील गेट समोर उभ्या राहिल्या असता पुण्याच्या दिशेकडून नगरकडे भरधाव वेगात येणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीचा सुपर कॅरी टेम्पोने (क्र.एम एच १२ डब्ल्यू एक्स २०५९) कल्याणी महारनवर यांच्या हाताला धडक दिली.

त्यामुळे त्यांच्या हातातील त्यांचा तीन वर्षाचा मुलगा स्वराज हा खाली पडून गंभीर जखमी झाला. अपघात होतात तेथील नागरिकांनी स्वराज यास तात्काळ नगरमधील खाजगी रुग्णालयात नेले, तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर स्वराज यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी मुलगा स्वराज यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

त्यानंतर महारनवर यांनी केडगाव इंडस्ट्रियल एरिया मधील रॉयल एनफिल्ड शोरूम च्या गेट समोरील लोकांकडे चौकशी केली असता त्यांना टेम्पोचा क्रमांक व चालक शंकर राघू मोरे व त्याच्यासोबत क्लीनर चंद्रकांत दत्तात्रय जपकर अशी त्यांची नावे असल्याचे समजले .त्या दोघांनीही मद्य प्राशन केलेले असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्या टेम्पोत दारूच्या बाटल्याही आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी संभाजी महारनवर यांनी दिलेले फिर्यादीवरून टेम्पो चालक शंकर मोरे आणि क्लीनर चंद्रकांत जपकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. पोलिसांनी टेम्पो चालक शंकर मोरे व क्लीनर चंद्रकांत जपकर यांना टेम्पो सह ताब्यात घेतले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post