अहिल्यानगर ः शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद अहील्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा नुकतीच जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहिल्यानगर येथे उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला.स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी प्रियांका खंदारे,विशाल गर्जे,मनपा क्रीडा अधिकारी वेन्सेंट फिलिप्स जेष्ठ क्रीडा शिक्षक राजेंद्र पवार, कराटे असोसिएशनचे राष्ट्रीयपंच अमित बडदे,प्रवीण गीते,सुरज खंडिझोड,अरुणोदय क्रीडा प्रतिष्ठानचे महेश आनंदकर, वैभव देशमुख, मच्छिंद्र साळुंके, टीम टॉपरचे प्रशांत पाटोळे,सुरज गुंजाळ, आदित्य क्षीरसागर, साबिल सय्यद , राम हरदे, धर्मा घोरपडे, सरफराज सय्यद,यांच्या हस्ते झाले.स्पर्धेसाठी दि इंडियन पॉवर मार्शलआर्ट असोसिएशनचे ग्रँडमास्टर संजय आनंदकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच जालना टीम चे पंच नसिर सय्यद, जुनेद खान, सागर भाले, दीपक मगरे, अशरद सय्यद यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. विजेत्या खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी अहील्यानगर संघात निवड झाली आहे.
Post a Comment