अहिल्यानगर ः राज्यात महायुतीच्या सरकार महुमाताने निवडून आलेले असले तरी अंतर्गत संघर्ष सुरु आहे. या संघर्षामुळेच राज्यात रोज नवीन काय घडेल, सांगता येत नाही. त्यात, रोजच राज्यातील राजकीय घडामोडी एकामागून एक घडत आहेत. या घडामोडींमध्येच साईसंस्थानचे आगामी काळात अध्यक्ष म्हणून विवेक कोल्हे यांना संधी मिळणार असल्याची भाजप कार्यकर्त्यांध्ये जोरदारपणे सुरु आहे.
हे पाहिले का ः जिल्हा परिषदेला वायरिंगचा वेढा....
विधानसभा निवडणूक महायुतीने ही निवडणूक लढविलेली आहे. जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघात दर पंचवार्षिकला काळे विरोधात कोल्हे अशीच लढत झालेली आहे परंतु या वेळी महायुतीमध्ये अजित पवार गट असल्याने व निव़डणुकीत उमेदवारदेताना महायुतीचीसह महाविकास आघाडीची दमछाक झाली होती.
हे वाचून क्लिक करून पहा ः जिल्हा परिषदेत कर्मचार्याचा मनमानी कारभार....
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार गटाला गेली. त्यामुळे या वेळी कोल्हे यांना निवडणुकीत उभे राहण्याची मात्र तयारी सुरु होती. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे युवा नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पक्षाच्या ज्य़ेष्ठ नेत्यांनी एकत्र येत कोल्हे यांनी उमेदवारी करण्यापासून परावृत्त केले.
कोल्हे यांनी पक्षाचा आदेश मानून त्यांनी काळे यांच्या प्रचाराचीसहभाग घेत त्यांचा विजय एकहाती केला. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य आमदार आशुतोष काले यांना आहे. त्यांच्या विजयात कोल्हे यांचा मोठा वाटा आहे. हे भाजपच्या नेत्यांनीही मान्य केलेले आहे.
त्यामुळे आता आगामी काळात साईसंस्थानच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया होणार आहे. यावेळीही कोपरगाव तालुक्यातच साईसंस्थानचे अध्यक्षपद येणार असल्याची चर्चा आहे. त्याला भाजपमधील अनेक ज्येष्ठनेत्यांनीही सिग्नल दिलेला आहे.
अमित कोल्हे यांनाच साईसंस्थानचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी कोपरगाव तालुक्यातून होत आहे. त्याला जिल्ह्यातील भाजप नेत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे साई संस्थानच्या विश्वस्त पदाच्या हालचाली सुरु झाल्यानंतरच लगेच अध्यक्षपदाची संधी विवेक कोल्हे यांनाच दिली जाणार असल्याची भाजप वर्तुळात चर्चा सुरु आहे
Post a Comment