संगमनेर ः निमोण तळेगाव या दुष्काळी भागाला वरदान ठरणारी भोजापूर पूरचारी ही जल संधारण विभागाकडून जलसंपदाविभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुरचारीचे प्रलंबित राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून द्यावीत .असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे
संगमनेर तालुक्यातील सोनुशी येथील गिते वस्तीजवळ गायब झालेल्या पूरचारीच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. आमदार खताळ म्हणाले, जलसंधारण आणि जलसंपदा या दोन्ही विभागाच्या गुंत्यामुळे या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीमुळे तसेच नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी आपल्या हक्काचे पाणी सिन्नर तालुक्यात पळवले. त्यामुळे खऱ्या अर्थाने तळेगाव निमोण भागातील शेतकरी गेली ४० ते ५० वर्ष पाण्यापासून वंचित राहिले आहे.
जलसंधारण विभागाने या पूरचारीचे काम केले आहे .परंतु या कामासाठी नाशिक च्या जलसंपदा विभागाची सहकार्याची भूमिका राहिली नाही.त्यामुळेखर्याअर्थाने हा दुष्काळी भाग अनेक वर्ष पाण्यापासून वंचित राहिला आहे.परंतु आत्ता प्रत्यक्ष आपल्याला या भागामध्ये भोजापुरचे पाणी आणून दाखवायचे आहे याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत बैठक पण झाली आहे.ही पूरचारी जलसंधारण विभागाकडून जल संपदा विभागाकडे वर्ग केली आहे.त्या मुळे आता या पूरचारीचे काम थांबणार नाही.तर अति जलद गतीने सुरू होणार असल्याचा विश्वास आ अमोल खताळ यांनी या भागातील शेतकऱ्यांना दिला.
यावेळी जलसंधारण विभागाचे उप विभागीय जलसंधारण अधिकारी कपिल बिडगर, सुरेश मंडलिक, भोजापुर पूरचारी संघर्ष समिती प्रमुख किसन चत्तर, भाजप ज्येष्ठ नेते भिमराज चत्तर, शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, रावसाहेब घुगे, भाऊसाहेब घुगे, गणेश दिघे, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सानप, भाजप युवा नेते अमोल रवी सोनवणे, सचिन आभाळे, डॉ. आर. पी. दिघे, राजू जाणेकर, सुनील दिघे, शंकर चत्तर, सोपान कांदळकर, संपत फड, राजेंद्र आहेर, अनिल बोऱ्हाडे, काशिनाथ बोऱ्हाडे, श्रीकांत सोनवणे, अशोक गोडगे, भाऊसाहेब सोनवणे, प्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते.
भोजापुर पूरचारी संघर्ष समितीचा असा सुरू होता लढा
अनेक वर्षांपासून राजकीय विळख्यात अडकलेली निमोण तळेगाव भागातील भोजापूर पुरचारी फक्त कागदावरच राहिली. अनेक वेळा कोट्यावधी रुपये खर्च झालेल्या या पूरचारीला मात्र कधीच पाणी आले नाही असा गंभीर आरोप या पूरचारी लाभ क्षेत्रातील शेतकर्यांनी केला. प्रत्येक निवडणुकीला या चारीचे पूजन करत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा डाव येथून मागच्या लोकप्रतिनिधींनीचा कायमच राहिला. माहितीच्या अधिकारात शेतकऱ्यांना मिळालेल्या माहितीतून संबं धित विभागाने 27 ठेकेदारांना या कामाचे टेंडर दिले होते. मात्र काम पुर्णत्वाचा शेरा देऊन विभागाने ठेकेदारांची बिलेही अदा केली गेली. या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी तळेगाव दिघे येथे भोजापूर पूर चारी संघर्ष समितीने हमारानो उपोषण सुद्धा केले होते.तसेच सोनुशी जवळील गिते वस्ती येथील भूमी अधिग्रहित होऊन ही ही पूरचारीच गायब झाली असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले होते. सदर कामाची चौकशी झाली पाहिजे यासाठी तळेगाव दिघे येथे रस्ता रोको आंदोलन ही केले होते.
Post a Comment