राहाता ः घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे ४६ हजाराचा मुद्देमाल लांबविल्याची घटना शिंगवे येथे घडली आहे. या प्रकरणी राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शोभा मच्छिंद्र बगे (वय ५० रा. वारी रोड, शिंगवे, ता. राहाता) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २६ एप्रिल रात्री दहा ते २७ एप्रिल पहाटे चारदरम्यान चोरट्यांनी घराचा मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरातील सामानचा उचकापाचक करून सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणा राहाता पोलिस ठाण्यात घरफोेडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक फौैजदार मंडलिक करीत आहे.
Post a Comment