पाथर्डीत साडेसात हजाराची घरफोडी

पाथर्डी ः दुकानाचे छत उचकटून दुकानातील रोख रक्कम साडेसात हजाराची रक्कम चोरून नेल्याची घटना पाथर्डी शहरातील मार्केट यार्डमधील दुकानात घडली आहे. 


याबाबत साहिल संजयकुमार लुनावत (वय ३१, धंदा किरणा दुकान, रा. वामनभाऊ नगर पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मार्केट यार्ड येथे माझे किराणा दुकान आहे. रविवार (ता. २७) रोजी रात्री रात्री घडली. 

चोरट्यांनी दुकानाच्या छताचे पत्रे उचकटून दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील रोख साडेसात हजाराची रक्कम लांबविली.  या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हेडकाॅन्स्टेबल सोनवणे करीत आहेत.-

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post