अहिल्यानगर ः जिल्ह्यातील एका मोठ्या गावातील गाव पुढारी जे विधानसभा निवडणुकीत पाहुण्याची पालखी मिरवत होते. ते विद्यमान आमदारांकडे यांच्याकडे निधी मागण्यासाठी गेले असता आमदारांनी संबधित स्वयंभू नेत्यांची चांगलीच कान उघडणी केलीचे वृत्त तेजवार्ताने प्रसिध्द केले. यामुळे जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात चांगलीच चर्चा सुरु होती. प्रत्येक मतदारसंघात ही घटना आपली तर नाही ना असा प्रश्न कार्यकर्ते एकमेकांना विचारत होते.
जिल्ह्यातील एका तालुक्यातील पूर्व भागातील एका बड्या गावातील काही मंडळी गावातील मंदिरासाठी निधी मागण्यासाठी आमदारांकडे गेले होते. यावेळी आमदारांनी संबंधिता़ंची कानघडणी केल्याची घटना घडलेली आहे. या घटनेची एकाच्या तोंडून दुसऱ्याने असे करत सर्वत्र पसरली होती.
याची माहिती तेजवार्ताच्या प्रतिनिधीला होताच या बाबतची वृत्त प्रसिध्द करण्यात आले. या वृत्ताची जिल्हाभर चांगलीच चर्चा झाली. प्रत्येक जिल्ह्यात हा प्रसंग आपल्यात मतदारसंघातील असून कोणाला बोलले याचे कार्यकर्ते शोध घेत होते.
रविवारी दिवसभर याच प्रकरणावर चर्चा जिल्हाभर सुरु होती. तेजवार्ताने प्रसिध्द केलेले वृत्त संबंधित आमदार महोदयांनी वाचलेले आहे. त्यावर त्यांनी उघड प्रतिक्रिया दिलेली नसली तरी त्यांच्या पक्षाच्या एका नेत्याशी यावर त्यांनी चर्चा केली आहे.
या घटनेमुळे आता जिल्ह्यातील अनेकांनी विरोधात काम करून आता आमदारांकडे निधी मागायला कसे जायचे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पुढच्या ठेच मागचा शहाणा या म्हणी प्रमाणे आता ठेच लागलेल्यांचे बोट तुटलेले आहे.
जिल्ह्यातील एका तालुक्यातील एका मोठ्या गावात दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. त्याचबरोबर जे समर्थक इतर लोकांना घेऊन आले होते. त्यांच्या विषयी ही आमदार महोदयांनी नाराजी व्यक्त केली.
आमदार महोदया़ंनी त्या लोकांची कान उघाडणी केल्याची तालुक्यात चांगलीच चर्चा होती. त्या तालुक्यातील पूर्व भागातील गाव असून त्या गावात ते नेते पोहचण्याच्या आतच चर्चा सुरू होती.
Post a Comment