नवविवाहितेला पळून नेण्याचा प्रयत्न....

छत्रपती संभाजीनगर : एका नवविवाहितेला पळवून नेण्याचा प्रयत्न वऱ्हाडी मंडळींनी हाणून पाडला. या गडबडीत, अपहरणकर्त्यांच्या वाहनाने एका दुचाकीला धडक दिल्याने  ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक केली आहे.



पिशोर येथून लग्न लावून लग्नाचे वऱ्हाड बाजारसावंगी येथे परत असताना नवरदेव - नवरीच्या वाहनाचा पाठलाग करून नवविवाहितेच्या अपहरणाचा प्रयत्न वऱ्हाडी मंडळीच्या सतर्कतेमुळे ग्रामस्थांनी हाणून पाडला. ही घटना खुलताबाद तालुक्यातील इंदापूर बाजारसावंगी रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी घडली. 

एडका तरुणाचे लग्न समारंभ आटोपून ते बाजारसावंगीकडे येत असताना बाजारसावंगी - इंदापूर रस्त्यावर जय भवानी मंगल कार्यालयासमोर पांढऱ्या रंगाची कार नवरदेवाच्या वाहनाला आडवी लावली. यातील संशयित आरोपींनी कट रचून गाडीतून नवरीला बाहेर ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. 


संशयितांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्याने मारहाण केली. अपहरणकर्त्यांच्या वाहनाने बाजारसावंगीकडून इंदापूरकडे आठवडी बाजारातून बाजार घेऊन जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव हे पोलिस फाट्यासह घटनास्थळी पोहोचले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post