उपनगराध्यक्षांचा राजीनामा न झाल्याने नाराजी...

कर्जत : नगराध्यक्ष निवडीवर कर्जत तालुक्यात जी उलथापालथ झालेली आहे. त्यावरील चर्चेचे गुर्हाळ काही केल्या कमी होेत नाही. दिवसेंदिवस या चर्चेचे गुर्हाळ आणखीच रंगत चालले आहे. 


सध्या कर्जत तालुक्यात एकच डाॅयलाॅग हिट झालेला आहे. हा डायलाॅग नगराध्यक्षावरील अविश्वास ठरावा दाखल झाल्यापासून चांगलाच प्रचलित झालेला आहे. लाव रे तो व्हीडीओ अन् येऊ दे सत्य बाहेर असे कर्जतकर म्हणत आहेत.

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला होता. १३ नगरसेवकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्याकंडे अविश्वास ठराव दाखल केला होता. 

हा ठऱाव एकदा नव्हे तर दोनदा दिला होता. यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. नगराध्यक्ष राजीनामा देत नसल्यामुळे आम्ही बाहेर पडलो असल्याचे काहींनी सांगितले. तर काहींनी नगरसेवक विश्वास घेत नसल्याचे स्पष्ट केले होते. 

नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्ष राजीनामा देतील, असे सांगितले जात होते. राऊत यांचा राजीनामा आल्यानंतर लगेच उपनगराध्यक्ष राजीनामा देऊन दोन्ही निवडी बरोबर होतील असे जाहीर केले होते. 

नाशिक येथील झालेल्या बैठकीमध्ये  विधान परिषदेचे सभापती यांच्यासमोर  नगराध्यक्ष यांच्यावरील अविश्वास  पारित झाला की लगेच उपनगराध्यक्ष राजीनामा देतील असे ठरले होते. 

त्यानुसार गटनेते संतोष मेहत्रे यांनी  अविश्वासाच्या बैठकीनंतर  उपनगराध्यक्ष राजीनामा देतील आणि नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडी होतील असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. 

नगराध्यक्षांचा राजीनामा मंजूर झालेला असून नगराध्यक्ष निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रमही जाहीर झालेला आहे. मात्र उपनगराध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. 

त्यामुळे उपनराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले संतोष मेहत्रे, सतीश पाटील व भास्कर भैरवी यांची भ्रमनिराशा झाल्याची चर्चा कर्जत तालुक्यात सुरू आहे.

त्यामुळे कर्जतकर लाव रे तो व्हीडीओ असे म्हणत आहेत. बंडखोरांना साथ दिलेल्या नेत्याने त्यांच्या समर्थकांनी समाज माध्यमावर दिलेल्या प्रतिक्रिया प्रमाणे कारभार करावा, अन्यथा त्या समर्थकांसह नेत्याच्या शब्दाला किमत राहणार नसून प्रत्येकजण हेच म्हणेल लाव रे तो व्हीडीओ..आणा रे  सत्य बाहेर... 

त्यामुळे दिलेला शब्द नेत्यांसह गटनेत्यांनी पाळावा, लाव रे तो व्हीडीओ म्हणण्याची वेळ कर्जतकरांवर वारंवार आणून नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या ते व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post