चोपडा : मुलीने आंतरजातीय प्रेम विवाह केल्याचा राग मनात ठेवून सीआरपीएफच्या सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या बापाने एका लग्न सोहळ्यात जावई व मुलगी नाचत असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
हृदयद्रावक घटना चोपडा शहरात घडली आहे. खोटी प्रतिष्ठा व जातीय अहंकाराचा आणखी एक बळी गेल्याने जळगाव जिल्हा हादरला आहे.
तृप्ती वाघ ही चार महिन्यांची गर्भवती होती तिने अविनाश यांच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मुलीच्या बापाच्या मनात खदखदत होता. मुलीने चारचौघात अब्रु घालविली या रागाने फणफणलेल्या किरण मांगले यांनी पुण्यातून नातेवाईकाच्या लग्नासाठी चोपडा शहरात आले असताना हळदीच्या कार्यक्रमात त्यांच्यावर हा गोळीबार केला. त्यामुळे लग्न मंडपात हाहाकार उडाला.
अविनाश यांच्या सख्ख्या बहिणीचा विवाह सोहळा या घटनेमुळे आज अंत्यंत साध्या पद्धतीने पार पाडण्यात आला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत गोळीबार करणारा मुलीचा बाप किरण अर्जुन मंगले हे देखील गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
तृप्ती हीने तिच्या वडिलांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन अविनाश यांच्याशी प्रेमविवाह केला होता.
Post a Comment