अजित पवार यांच्या पथकावर मधमाशांचा हल्ला...

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मधमाशांनी चावा घेतला. या घटनेत ते जखमी झाले आहेत. अजित पवार हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे.  


कसबा गावातील सरदेसाई वाड्याची पाहणी करताना संगम मंदिर परिसरात ही घटना घडली. अचानक मधमाशांनी हल्ला केल्यामुळे ताफ्यातील अनेकांची चांगलीच धावपळ उडाली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित गाडीमध्ये बसवण्यात आले.

सरदेसाई वाड्याची पाहणी करताना मधमाशांनी हल्ला केला, मधमाशांचा अचानक हल्ला झाल्यामुळे अजित पवार यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली, मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावासाठी कर्मचाऱ्यांना चांगलंच पाळवं लागलं, काही जणांनी आपल्या हातमधील उपरण्यांनी मधमाशांना दूर हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील यातील काही कर्मचाऱ्यांना मधमाशांनी चावा घेतला.

रत्नागिरीमधील सावर्डे येथे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अर्थसंकल्पात मी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.  

महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसताना चर्चा करत असतात, मात्र ही योजना सुरूच राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटले आहे, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशांकरता ही योजना आहे, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post