श्रीगोंदा ः पारगाव सुद्रिक येतील बीएसएनएल टाॅवरजवळून दुचाकीची चोरी झाली आहे. ही घटना १७ ते १८ एप्रिल रोजी घडलेली आहे. याबाबत शिवाजी पांडुरंग हिरवे (वय ४५, रा. पारगाव सुद्रिक) यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.
त्यात म्हटले आहे की, पारगाव सुद्रिक येथील बीएसएनएल टाॅवर जवळ दुचाकी उभी केली होती. मात्र ती कोणी तरी घेऊन गेले. दुचाकीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक भागवत करीत आहेत.
Post a Comment