अहिल्यानगर ः १ मे कामगार दिनाचे औचित्य साधत राज्यातील कामगारांच्या प्रश्नावर राज्यभर जनजागृती मोहीम राबवून जनसंपर्क अभियान घेवून अर्थव्यवस्थेचा कणा असणारे कामगार अनेक संकटांना सामारे जात आहेत. कामगारांचे प्रश्न हे केवळ त्यांचे व्यक्तीगत प्रश्न नाहीत, तर संपूर्ण राज्याच्या विकासाशी संबंधित आहेत, अशी माहिती तथा सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी दिली.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पवळे यांनी म्हटले आहे की, कामगार सुखी असेल तर अर्थव्यवस्थेचा कणा सुरक्षित राहील कामगार वर्ग हा कोणत्याही देशाच्या औद्योगिक व सामाजिक विकासाचा कणा आहे. त्यांच्या श्रमाच्या जोरावर उद्योग, सेवा आणि शेती क्षेत्र भरभराटीस येते. परंतु दुर्दैवाने, आजही बहुसंख्य कामगार विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करत आहेत.
त्यांच्या अडचणी केवळ आर्थिकच नाहीत, तर सामाजिक, मानसिक व आरोग्याशी संबंधित देखील आहेत ग्रामीण भागातील अनेक कामगार चांगल्या नोकरीच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करतात. तेथे त्यांना वस्तीच्या, पाण्याच्या, स्वच्छतेच्या आणि शिक्षणाच्या सोयी अत्यंत अपुऱ्या मिळतात. त्यामुळे त्यांचे राहणीमान अत्यंत हालाखीचे असते.
मानसिक आरोग्य, दैनंदिन तणाव, अस्थिर नोकरी, कमी वेतन, आणि भविष्याची अनिश्चितता यामुळे कामगार वर्गात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे आत्महत्या, व्यसनाधीनता यांसारख्या गंभीर सामाजिक समस्याही उद्भवत आहेत. म्हणूनच कामगारांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहून उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
कामगार हा केवळ एक कर्मचारी नाही, तर विकासाच्या रथाचा सारथी आहे. कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी सुरक्षिततेसाठी एकजुटीतुन कामगारांच भविष्य उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी राज्यात नवे पर्वे उभारून कामगारांच्या घामाला न्याय देण्यासाठी राष्ट्राच्या हितासाठी कामगारांचे संरक्षण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी १ मे कामगार दिनापासून कामगार एकता कामगार संरक्षण राज्यव्यापी जनजागृती अभियान सुरू करणार आहे.
या अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी ८०५५५५१४०३ या क्रमांक संपर्क साधण्याचे शरद पवळे यांनी सांगितले असुन कामगाराचा सन्मान हाच ध्याय घेवून हे अभियान सुरू करत आहोत असे प्रसारमाध्यमांना बोलताना पवळे यांनी सांगितले.
कामगारांच्या श्रमावर देशाची उन्नती समृद्धी आणि भविष्य अवलंबुन आहे त्याच संरक्षण व सन्मान करणे हे प्रत्येक राष्ट्राचे कर्तव्य आहे या उद्देशाने कामगार दिनापासून राज्यभर कामगारांचे प्रश्न सोडवून न्याय देण्यासाठी कामगार एकता जनजागृती मोहीम राबवणार सुरू करून नवा आदर्श राज्यात उभा करण्याचा संकल्प याठीकाणी केला आहे.
- शरद पवळे, कामगार एकता अभियानाचे जनक
Post a Comment