बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसंबंधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी दुपारच्या वेळी वाल्मिक कराडला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर त्याचा सिटीस्कॅन करण्यात आला. आता त्याचा अहवाल समोर आल्यानंतर पुढील उपचाराची दिशा ठरणार आहे.
बोलण्यास व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने शनिवारी दुपारी बीड जिल्हा कारागृहात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्याचे सल्ला दिला होता.
त्यानुसार बीडच्या जिल्हा रुग्णालयात वाल्मिक कराडची सिटीस्कॅन तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचाराची दिशा ठरणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाल्मिक कराडसह संतोष देशमुख खून प्रकरणातील इतर आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. त्यांना स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांकडून अनेकवेळा करण्यात आला आहे.
कारागृह प्रशासनावर आरोप झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली होती. त्यानुसार या कारागृहाची वारंवार तपासणी केली जात आहे.
Post a Comment