महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनचे हे आहे कार्य...

महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर एमआरएसपी व सीडी या संघटनेद्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शाळेत शालेय विद्यार्थी यांच्याकरिता वाहतूक सुरक्षा व नागरी सरंक्षण हा विषय संघटनेच्या प्रशिक्षित शिक्षकाद्वारे वर्ग पाचवी ते दहावी पर्यंत राबविल्या जातो.


यात प्रामुख्याने वाहतूक नियंत्रण, कवायत,  अग्निशमन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन या विषयाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिल जाते, यामुळे देशप्रेम राष्ट्रीय एकात्मता, अनुशासन जोपासणे, विनयशिलता, सेवाभावीवृत्ती, शिस्त व आदर्श नागरीक तसेच अपघातग्रस्तास करावयाची मदत असे गुण शालेय जिवनातच अंगी घाळगण्याच्या प्रयत्न केला जातो. 

केवळ युध्दजन्य परिस्थितीतच नव्हे तर नैसर्गिक आपत्तीचे वेळी कमीत कमी स्वतःचे कुटूंबियासह रक्षण करणे इतपत आवश्यक ज्ञान शाळकरी मुलांना देण्याचे कार्य आपली राज्यसंघटना गेली 50 वर्षापासून करित आहे. 

संपूर्ण भारतात महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की, त्या राज्याने शिक्षणाच्या सबंध जिवनाशी आणण्याकरीता नविन पाठ्यक्रम माध्यमिक शाळांसाठी राबविला आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण हा विषय शिक्षण व पोलीस विभागामार्फत राबविला जातो. 


एस.एस.सी. बोडॉन स्कूल सर्टिफिकेट सब्जेक्ट या विषयास पी-5 असा कोड नंबर देवून मान्यता दिलेली आहे व हे शिक्षण निमलष्करी पध्दतीचे शिक्षण दिल्या जाते.

जगात सर्वात जास्त रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण हे भारतात असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. भारतात दरवर्षी होणान्या रस्त्यावरील अपघातामध्ये साधारण दिड लाख लोक मरण पावत असल्याचे, तर साधारण पाच लाख लोकांना कायमस्वरुपी अपंगत्व येत असल्याचे दिसून येत आहे. 

या बाबतीत महाराष्ट्र राज्यात मृत्यूमुखी पडणान्याची संख्या सुध्दा मोठ्याप्रमाणात आहे. कोणत्याही युध्दामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये, साथीच्या रोगामध्ये जेवढी मानवी जिविताची हानी झाली नाही, त्यापेक्षाही अधिक मानवी जीवांना रस्त्यावरील अपघातामध्ये जीव गमवावा लागतो. 

रस्त्यावरील अपघातांची कारणमिमांसा करताना 75 टक्के कारणे वाहनचालकाशी निगडीत आहेत, आजच्या या गतिमान युगात विज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे अत्यंत आधुनिक व अति वेगाने धावणारी वाहने रस्त्यावर धावू लागली आहेत. 

लोकसंख्या आणि वाहनाच्या संख्येत बेसुमार वाढ झाली आहे. मात्र देशातील रस्ते आहेत तेवढेच आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणजे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. भारतात दर चार मिनिटाला एक अपघात होत असून यावर कायम स्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक नागरीकात ट्रॅफीक विषयी जनजागृती' निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.

गेल्या काही वर्षापासून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. लोकांचा राहणीमानाचा दर्जा वाढला आहे. त्यामुळे सरासरी प्रत्येक कुटुंबात एक तरी वाहन आहेच. अपुऱ्या व अरुंद रस्त्यावर दररोज एकाचवेळी हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे अपघात होतात व जिवीत व वित्त हानी मोठया प्रमाणात होते. म्हणून शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या अंगी ट्रॅफीक विषयी जनजागृती' यावा आर.एस.पी.हा विषय प्रत्येक शाळांमधून 

राबविण्यात यावा असे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे. हे काम पोलीसांच्या मदतीने व आरएसपी शिक्षक अधिकांरीबरोबर राज्यातील सर्व शाळांमध्ये आर.एस.पी. युनिट सुरू असून, लाखो विद्यार्थी या राष्ट्रीय कार्यास आर.एस.पी. च्या माध्यमातून सहकार्य व मदत करीत आहे. 

मुंबई पोलीस विभागाने सन 1948 साली लोकसंख्येच्या अफाट वाढ व औद्योगीकरणामुळे वाढलेल्या वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, परिणामतः रस्त्यावरील अपघातांची संख्याही वाढू लागली, म्हणून रस्ता सुरक्षिततेचे शिक्षण देण्याच्या दृष्टीने एक प्रचार शाखा सुरू केली. या मोहिमेत शाळकरी मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

शाळांना भेटी देणे, रस्ता सुरक्षिततेबाबत चित्रपट दाखवण्यात आले. रस्त्यावरील वागणूक संबंधी भाषणे ठेवण्यात आली. शाळांतून आणि मुलांकडून मिळालेला प्रतिसाद प्रशंसनीय होता. शाळेचा रस्ता ओलांडणे इतर बाबीसाठी मुलांना प्रशिक्षण देण्याची कल्पना पुढे आली आणि फेब्रुवारी सन 1951 मध्ये भरडा न्यू हायस्कूल, मुंबई मधील मुलांचे एक पथक निवडण्यात आले आणि त्यास वाहतूक नियंत्रणाबद्दल रितसर प्रशिक्षण देण्यात आले. 

या मुलांनी अशा उत्कृष्ठपणे त्यांची कर्तव्ये पार पाडली की, वृत्तपत्रांनी आणि जनतेने त्यांची प्रशंसा केली. सन 1957 मध्ये त्यांच्या पथकाला "रस्ता सुरक्षा दल" असे नांव देण्यात आले व या योजनेस गती येवून सन 1962 साली नागपूर येथे महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन स्थापन झाले. नंतर पोलीस विभाग व शिक्षण विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील शाळात हा विषय सुरू करून विषयाची व्याप्ती वाढविली. म्हणून "पोलीस विभाग" हा आर.एस.पी.चा जन्मदाता असून पोषणकर्ता "शिक्षण विभाग" मानला जातो.

सदर विषयाचे कामकाज महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये असणाऱ्या माध्यमिक शाळांच्या माध्यमातून चालविले जाते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आर.एस.पी. विषयाला मोठ्याप्रमाणात चालना दिली व आर.एस.पी. विषय पुस्तिकेसह प्रत्येक जिल्हयातील प्रभारी मा. पोलीस अधिक्षक (अध्यक्ष) व मा. शिक्षणाधिकारी (उपाध्यक्ष) तसेच संघटनेकडून नियुक्त जिल्हासमादेशक यांच्या समितीकडून पाहिले जाते.

आर.एस.पी. च्या माध्यमातून शाळेत विद्यार्थ्यांना अपघात व अपघाताची कारणे, वाहतूकीचे नियम व आपली जबाबदारी, अपघातात सापडलेल्यांना प्रथमोपचार या विषयांचे ज्ञान हे

आरएसपी शिक्षक अधिकारी मुलांना देत असतात. पोलीसांच्या बरोबर राज्यातील लाखो विद्यार्थी गणपती बंदोबस्तसाठी प्रत्येक वर्षी सज्ज असतात. पोलीसांच्या बरोबर व त्यांना मदत करण्याच्या हेतूने कोरोना बंदोबस्त, आपत्कालीन व पूर परिस्थिती असो वा गणेशोत्सव सार्वजनिक कार्यक्रम प्रसंगी शिक्षण विभाग व पोलीस विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जीवन सेवेसाठी या ब्रिद वाक्याला साजेसे व अभिनंदनीय कर्तव्या आर.एस.पी.च्या  माध्यमातून शिक्षक-शिक्षिका अधिकारी पार पाडत आहेत.

नाशिक विभागीय समादेशक ऑन डॉ. सिकंदर शेख महासमादेशक अनिल शेजाळे, राज्यउपाध्यक्ष पीतांबर महाजन, राज्य अध्यक्ष संजय शेंडे हे कार्यरत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post