कृषीमंत्र्यांंचे लाडकी बहिणीबाबत मोठं वक्तव्य...

नंदुरबार : जिल्ह्यातील शेतकर्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरवला आहे. पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा पाहाणी दौरा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून सुरू आहे. 


दरम्यान नंदुरबार दौऱ्यावरअसताना सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 


ते म्हणाले की, सरकार सर्वांना बरोबरीन् घेऊन चालले आहे. सर्वांना न्याय देणार आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले, मात्र अजूनही आकडेवारी आलेली नाही. 



राज्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे लवकरच पूर्ण होतील. पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार आहे, यावेळी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी उशीर होणार नाही, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षांकडे कमी आमदार असल्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेताही नेमता येत नाहीये. भविष्यातील काळ हा विरोधकांसाठी अवघड आहे,असे ते म्हणाले.

लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडला आहे, मात्र त्यामुळे बाकीच्या योजना बंदी पडतील असं काही होणार नाही, असं कोकाटे यांनी म्हटले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post