शिक्षण विभागाच्या त्या कार्यालयाचा रात्रीचा दरबार सुरूच

अहिल्यानगर  ः जिल्हा परिषदेतर्फे १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या कृती आराखड्यात शनिवारच्या दिवशी कार्यालयात येऊन काय कामे करायची याची सामान्य प्रशासनाने यादीच सर्वच जिल्ह्यातील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदींना दिलेली आहे.


मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या स्वाक्षरीने हे पत्र सामान्य प्रशासन विभागातर्फे जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांना देण्यात आलेले आहे.  या पत्राची प्रत अहिल्यानगर पंचायत समिती कार्यालयालाही प्राप्त झालेली आहे. या पंचायत समिती कार्यालयात आराखड्यानुसार कामकाज करण्यास सुरवात करण्यात आलेली आहे. 

ही सुरवात सुरवीतीच्या एक आठवडा करण्यात आली. त्यानंतर सर्व कामे तसेच असल्याची चर्चा सध्या पंचायत समिती वर्तुळात आहे. 

१०० दिवसांच्या कृती आराखड्यात संकेतस्थळ अद्यावर ठेवणे, सुकर जीवमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोई व सुविधा, गुंतवणूक प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या कामांचे उद्दीष्ट आहे. यातील एक ते दोन कामे अहिल्यानगर पंचायत समितीत पूर्ण झालेली असून उर्वरित कामे जैसे थेच असल्याची चर्चा आहे.

पंचायत समितीत स्वच्छतेच्या नावाने ऐसी की तैसी झालेली आहे. पंचायत समितीच्या आवारात केरकचर्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. तसेच पंचायत समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात कचरा जाळून प्रदुषण केले जात आहे. जाळलेल्या कचऱ्याचे ढिगारे पंचायत समितीच्य पाठीमागील बाजूस दिसून येत आहे.

आज शनिवारी पंचायत समितीतील शिक्षणसह सर्वच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दुपारीच गायब होते. त्यामुळे १०० दिवसांचा कृती आराखडा अहिल्यानगर पंचायत समितीने कागदोपत्री पूर्ण केलेला आहे. 

जिल्ह्यातील त्या पंचायत समितीत रात्रीचा दरबार अधूनमधून सुरुच आहे. विशेष म्हणजे १०० दिवसांच्या कृती आराखड्यात या कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी कधीच पूर्ण दिवस थांबत नाही, अशीच चर्चा अहिल्यानगर पंचायत समितीच्या कार्यालयात सुरु आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post