एकनाथ शिंदेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री...

कोल्हापूर : प्रशासकीय पातळीवर एकनाथ शिंदे हे जरी उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे शिंदे साहेबच आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आभार दौऱ्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असताना धैर्यशील माने यांनी हे वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. सरकारमध्ये बदल होणार अशीही चर्चा आता सुरू झालेली आहे.

प्रशासकीय पातळीवर एकनाथ शिंदे हे जरी उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे शिंदे साहेबच आहेत असे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. 

ते म्हणाले की,  विधानसभा निवडणुकीत आम्ही या मतदारसंघातील लोकांना आवाहन केले होते, तुम्ही आबिटकर यांना आमदार करा, त्यांना नामदार आम्ही करतो. मी सांगितले होते आबिटकर गुलिगत निवडून येतील आणि विरोधक झापूक झुपूक करतील. एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पाळला आहे, आबिटकर हे मंत्री झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात दहा पैकी दहा आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. यातले पाच आपल्या शिवसेनेचे आहेत. आमच्या पक्षाचं वलय वाढतंय, कारण विचाराला मुरड घातलेली नाही, नेतृत्व खंबीर आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारखं नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल, असे धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.

माने यांच्या वक्तव्याने वादळ उठलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रियाही दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post