निकालाआधी संचालकात बाचाबाची... अध्यक्षपदासाठी राजकीय दबाव...

जिल्ह्यातील एका संस्थेची नुकतीच निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत विरोधी गटाला बहुमतही मिळाले आहे. या विजयी जल्लोष होत आहे. या आनंदावर शिवीगाळीचे विरजन पडले आहे.  त्याची जिल्हाभर चर्चा अद्यापही सुरू आहे. 


हा वाद वाढणार असल्याचे स्पष्ट होताच काहींनी हस्तक्षेप करत वाद मिटविला. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एका संचालकाने राजकीय हस्तक्षेप करून पद मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात अपयश आलेले आहे. या घटनेची जिल्हाभर चर्चा झाली. 

जिल्ह्यातील एका नामवंत संस्थेची निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत चर्चेत होती. निकालानंतर त्या संस्थेतील विद्यमान संचालकांपैकी दोन ते तीन संचालकांमधील चर्चा चांगलीच चर्चेत आलेली आहे. 

या ना त्या कारणाने त्या संचालक मंडळातील वाद चर्चेत आलेले आहेत. ही चर्चा जिल्हाभर सुरू असली तरी संचालक मंडळातील काही वाद घालणारे नेते आमच्यात वाद नसल्याचे सांगू लागले आहे. 

आमच्या संस्थेत बाहेरील हस्तक्षेप कधीच नव्हता. परंतु आताच्या काही मंडळींनी सत्तेच्या स्वार्थापोटी  राजकीय हस्तक्षेप आणला आहे. त्याचा संस्थेच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण होणार आहे.

ज्यांनी संस्थेत राजकीय लोकांचा हस्तक्षेप आणला ते आगामी तीन चार वर्षात संस्थेतून बाहेर पडणार आहेत. परंतु त्यांच्या उद्योगाचा सर्वसामान्य सभासदांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सभासदांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.निवडणुकीत चूक झाल्याची चर्चा सध्या सभासदांमध्ये सुरू आहे.

सभासदांच्या चर्चेला संचालक मंडळ सत्तेच्या मस्तीत दुर्लक्षीत करीत आहे. नवीन नेतृत्व असलेल्या व निवृत्तीला अजून दहा ते बारा वर्षे असलेल्या नेतृत्वाने सभासदांच्या मताचा विचार करणे गरजेे आहे. सभासदांची मते जाणून घेऊनच कामकाज करावे अन्यथा सभासदांना दुर्लक्षित केल्याचा फटका त्यांच्यासह सर्वांनाच बसण्यास वेळ लागणार नाही, अशी चर्चा सभासदांमध्ये सुरू आहे.

गुण्यगोविंदाने संचालकांचा कारभार सुरू असल्याचे संचालक मंडळ दाखवत असले तरी आतून काहींचे उद्योग चांगलेच चव्हाट्यावर आलेले आहेत.  काहींनी आपल्या सहकारी संचालकाने पदाचा दावा करू नये म्हणून त्या संचालकांच्या नातेवाईकांविरोधात दाखल झालेल्या प्रकरणाची चर्चा आपल्या पंटरांच्यामार्फत समाज माध्यमावर घडवून आणण्याचे षडयत्र काहींनी रचल्याची चर्चा असल्याचे समजते.

पूर्वीच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात सामान्य सभासदांच्या मताला काडीची किंमत नव्हती. तीच री आताचे संचालकांनी ओढल्यास नवल वाटायला नको,अशा चर्चा झडू लागल्या आहेत. 

संचालकाच्याच मताला किंमत असल्याचे संचालक म्हणत आहे. त्यामुळे सभासदांनी आता आपल्या मताचा विचार करावा हीच अपेक्षा आहे. आपलं मत योग्य ठिकाणी गेले की अयोग्य ठिकाणी अशीच चर्चा सभासदामध्ये सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post