अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळातील दोन रिक्त जागांवर अशोक खळेकर व भाऊसाहेब गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. सहकार विभागाचे अधिकारी विक्रम मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत या निवडी करण्यात आल्या.
यावेळी चेअरमन सतिष मोटे, व्हा.चेअरमन दिलीप नागरगोजे, मानद सचिव शाम भोसले, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील, राज्य पदाधिकारी राजेंद्र पावसे, पतसंस्थेचे संचालक सुनिल नागरे, मंगेश पुंड, वाळीबा मुंढे, रुबाब पटेल, किसन भिंगारदे, उद्धव जाधोर, भगवान खेडकर, रामदास गोरे, संदीप लगड, सुरेश मंडलिक, नारायण खेडकर, सुनिल वाघ, सविता भाकरे, राणी फाटके, लक्ष्मण नांगरे, जिल्हा पदाधिकारी राजेंद्र मेहत्रे , महेश जंगम, राज्य कौन्सिलर राम कार्ले , तालुकाध्यक्ष संजय गि-हे, रोहिदास आघाव, तालुका सचिव समीर मणियार, महारुद्र बडे, शरद फाटके, संजय डौले, नितीन बटूळे, गोपी रोंढे, सखाहरी थोरात, संस्थेचे सेक्रेटरी प्रदीप कल्याणकर, नफीसखान पठाण आदींसह संस्था व संघटना प्रेमी पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
राहाता येथील संचालक बबन सांगळे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी राहाता येथीलच भाऊसाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. तसेच इतर मागास प्रवर्ग (जिल्हास्तर) संचालक बाळासाहेब आंबरे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी अशोक खळेकर यांची निवड करण्यात आली.
चेअरमन सतिष मोटे म्हणाले, ग्रामसेवक पतसंस्था ग्रामसेवकांची कामधेनु असून संस्थेला ५५ वर्षाची यशस्वी परंपरा आहे. "एकच ध्यास सभासदांचा विकास" या ध्येय धोरणानुसार उत्तम आर्थिक व्यवस्थापन करून पतसंस्थेमार्फत ग्रामसेवकांचे जीवनमान उंचावण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात येत आहे. आता या दोन नवीन संचालकांच्या अनुभवाचा लाभ संस्थेला मिळणार आहे. संस्थेने ठेवीवर अतिरिक्त (१०.५%) व्याजदर दिला आहे. भविष्यातही सर्वांना सोबत घेवून सभासद हिताच्या कामकाजाची परपंरा कायम राखू अशी ग्वाही सतिश मोटे यांनी दिली.
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील म्हणाले, सर्वोत्कृष्ट कारभारासाठी पतसंस्था राज्यात आदर्शवत मानली जाते. संस्थेचे पदाधिकारी, संचालक व कर्मचारी सर्वांना विश्वासात घेवून कामकाज करतात. आता दोन नवीन संचालकांमुळे सभासद हिताचे आणखी चांगले निर्णय होतील. सभासद व ठेवी वाढीसाठी त्यांची नक्कीच मदत होईल असा विश्वास आहे.
खळेकर व गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या सर्व सहकारी संचालकांनी व संघटना पदाधिकारी यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरेल आणि संस्थेची अजून भरारी होईल यादृष्टीने विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली.
Post a Comment