ड्युटीवर पोलिस कर्मचर्याचा मृत्यू

सिंधुदुर्ग : पोलीस दलात सेवा करत असताना असलेली धावपळ काहीसा तणाव यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांचे ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन झाल्याचे धक्कादायक प्रकार यापूर्वी घडले आहेत. 


अशीच एक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात घडली आहे. दोडामार्ग पोलिस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक गुंडू सुतार यांचे गुरुवारी ड्युटीवर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

गुरुवारी सकाळी ते ड्युटीवर आले यावेळी सेवा बजावत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने ते तातडीने उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात गेले. 

मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना गोव्यातील म्हापसा किंवा बांबोळी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यांना जवळच असलेल्या गोवा राज्यातील म्हापसा रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post