पदाची संधी न मिळाल्यास पुन्हा सत्तेत बदल... नगरसेवकांच्या समर्थकांत चर्चा...

कर्जत : नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर सत्ताधारी नगरसेवकांनी भाजपच्या दोन नगरसेवकांना समवेत घेत अविश्वास ठराव दाखल केला आहे. या नाट्यमय घडामोडी घडत असताना सर्वांनाच आता पदावर विरजमान होण्याची इच्छा झालेली आहे. 


सर्वांना आता पदाची संधी द्यायची असेल तर सहा महिन्यांचा कालावधी ठेवावा लागणार अशी चर्चा सध्या नगरसेवकांच्या समर्थकात सुरू आहे.

नगराध्यक्ष उषा राऊत यांना सत्य तो पाय उतार केले तरी नगरपंचायत मध्ये वर्चस्व त्यांचेच राहणार असल्याची चर्चा कर्जत तालुक्यात सुरू आहे. राऊत यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार यावर सध्या चर्चेचा खल सुरू आहे. 

नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपायला 18 महिन्यांचा कालावधी आहे. या अठरा महिन्यांच्या कालावधीत सर्व नगरसेवकांना पदाची संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांमधून होत आहे.

तीन नगरसेवकांना आपल्याला संधी मिळेल अशी आशा लागली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नाहीतर नगराध्यक्ष दुसर्या टप्प्यात आपल्याला नगराध्यक्षपदाची संधी मिळेल अशी आशा लागलेली आहे.

काही नगरसेवकांना आपल्याला सभापती पद मिळेल अशी आशा लागली आहे त्यासाठी काहींनी या हालचालीतच वरिष्ठांकडून शब्द घेतलेला आहे अशी चर्चा नगरसेवकांच्या समर्थकात सुरू आहे. 

वरिष्ठ नेत्यांनी सर्व नगरसेवकांच्या इच्छा लक्षात घेऊन सर्वांना पदाची संधी मिळावी यासाठी सहा महिन्यांची टर्म ठेवावी अशी मागणीमधून होत आहे. 

सहा महिन्यात जर नगरसेवकांना संधी मिळाली नाही तर ते पुन्हा आमदार रोहित दादा पवार गटात दाखल होतील अशीही चर्चा आता कर्जत तालुक्यात जोर धरत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post