अहिल्यानगर : प्राथमिक शिक्षक बँकेत पुन्हा सत्तांतर झाले असून बापूसाहेब तांबे गटाची सत्ता आलेली आहे. बँकेत नाट्यमय घडोमोडी घडल्या आहेत. अचानक झालेल्या बदलाने सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला असून पंधरा संचालक आपल्या गोटात असल्याच्या वल्गना हवेत विरल्या आहेत.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कर्जतचे संचालक बाळासाहेब तापकीर तर उपाध्यक्षपदी राहात्याचे संचालक योगेश वाघमारे यांची निवड झाली.
श्री बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली 2022साली जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासात पात्र राहून शिक्षक बँकेचा कारभार काटकसरीचा व सभासद हिताचा केला जाईल अशी ग्वाही यावेळी चेअरमन श्री तापकीर यांनी दिली.
मागील नऊ महिन्यापूर्वी शिक्षक बँकेत ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये राज्याने मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला परंतु जिल्ह्यातील सभासदांच्या तो लवकरच लक्षात आला आहे. गुरुमाऊली सदिच्छा मंडळाच्या जाहीरनाम्यानुसार आगामी दोन वर्षाच्या काळामध्ये शिक्षक बँक ही राज्यांमध्ये निश्चितपणाने अग्रगणी राहील अशी ग्वाही यावेळी नेते श्री बापूसाहेब तांबे यांनी दिली. आज झालेल्या चेअरमन निवडी मध्ये मतदान होऊन श्री बाळासाहेब तापकीर यांना बारा मते तर विरोधी श्री भाऊराव
राहिंज यांना आठ मते मिळाली. एक मत पत्रिका कोरी टाकली गेली.. आभार सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट हे होते. या निवडीचे शिल्पकार म्हणून
मा .व्हाईस चेअरमन श्री अर्जुनराव शिरसाठ , मा. व्हाईस चेअरमन श्री बाबासाहेब खरात, शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीम . विद्याताई आढाव यांनी महत्वाची भूमिका बजावली.यावेळी श्री रा.वी .शिंदे, गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष दुसुंगे , संघाचे अध्यक्ष श्री बबन दादा गाडेकर, गुरुमाऊली मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री आबासाहेब दळवी, डॉक्टर संदीप मोटे ,श्री अण्णासाहेब आभाळे श्री शशिकांत जेजुरकर श्री गोकुळ कळमकर ,यांची मनोगते झाली. कार्यक्रमास शिक्षक नेते श्री राजेंद्र शिंदे ,श्री राजेंद्र सदगीर, श्री रवींद्र पिंपळे , मंडळाच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष श्री शरद भाऊ सुद्रिक, संघाचे उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र कुदनर, राज्य उपाध्यक्ष श्री नवनाथ तोडमल, राज्य प्रसिद्धीप्रमुख श्री रविकिरण साळवे,श्री संतोष दळे,संघाचे कार्यकारी अध्यक्ष श्री नारायण पिसे, सरचिटणीस श्री प्रकाश नांगरे , जुनी पेन्शन हक्क संघटनेचे श्री राजेंद्र ठोकळ ,श्री सचिन नाबगे, श्री बाळासाहेब कापसे , बँकेचे संचालक श्री महेंद्र भनभने, श्री ज्ञानेश्वर शिरसाठ, श्री शशिकांत जेजुरकर श्रीमती निर्गुण बांगर कापसे, श्रीमती सरस्वती घुले, श्री कारभारी बाबर, श्री गोरक्ष विटनोर, मंडळाचे कार्याध्यक्ष श्री बाबासाहेब आव्हाड विकास मंडळाचे अध्यक्ष श्री प्रल्हाद भालेकर सचिव संतोष आंबेकर माजी सचिव संतोष मगर, ऐक्य मंडळाचे नेते श्री राजेंद्र निमसे, माझी व्हाईस चेअरमन श्री सुयोग पवार श्री संतोष भोपे ,श्री रामचंद्र गजभार, श्री राजेंद्र विधाते , विकास मंडळाचे सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री भास्करराव कराळे श्री सुखदेव अरोळे , श्री प्रदीप दळवी मंडळाचे सरचिटणीस श्री विठ्ठल काळे,संघाचे कार्यालयीन चिटणीस श्री डी एम शिंदे श्री परशुराम आंधळे ,श्री किरण दहातोंडे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण झावरे माजी जिल्हाध्यक्ष नाना गाढवे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री प्रकाश नांगरे यांनी केले.
गेल्या नऊ महिन्याच्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या कारभाराचे स्पेशल ऑडिट करण्याची घोषणा यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष दुसूंगे यांनी केली.
मागील निवडीच्या वेळी शिक्षक संघाच्या राज्य पातळीवरील नेतृत्वाने जिल्ह्यातील बँक निवडणुकीत हस्तक्षेप केला परंतु बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांनी तो डाव उधळून लावला आणि स्वकर्तुत्वावर पुन्हा सत्ता गुरुमाऊली सदिच्छा मंडळाने मिळवली अशी माहिती यावेळी श्री दत्ता पाटील कुलट यांनी दिली.
Post a Comment