जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला ८.४२ कोटीचा ढोबळ नफा

अहिल्यानगर - जिल्हापरिषद कर्मचारी सोसायटीला सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षामध्ये ८ कोटी ४२ लाखांचा ढोबळ नफा झालेला असून आवश्यक त्या तरतुदी रक्कम रुपये ४ कोटी ४६ लाख वजा करून संस्थेस ३ कोटी ९६ लाख निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कल्याण मुटकुळे यांनी दिली.  


ते म्हणाले, संस्थेची सभासद कर्ज मर्यादा १८ लाख असून सभासदांच्या मुदत ठेवीवर ८ टक्के व्याजदर दिल्यामुळे संस्थेच्या ठेवीत वाढ झालेली आहे. संचालक मंडळाने खर्चात काटकसर करून आणि आवश्यक त्या तरतुदी करून सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याची शिफारस केलेली आहे. 

सभासदांच्या कायम ठेवीवर ९ टक्के व्याज दिले आहे. नुकत्याच झालेल्या मासिक सभेमध्ये दि. ७ जून २०२५ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचा मानस आहे. असे चर्चाअंती ठरले असल्याचे चेअरमन मुटकुळे यांनी सांगितले.

मार्च २०२५ अखेर सभासद संख्या २५७२ असून संस्थेचे वसूल भाग भांडवल २५ कोटी ८१ लाख, फंड्स १९ कोटी १६ लाख, ठेवी १७४ कोटी ८२ लाख, सभासदांना कर्ज वाटप १६६ कोटी २१ लाख आहे. 


अहवाल सालात सभासद कल्याण निधी मधून विवाह भेट योजने अंतर्गत ९४ सभासदांच्या पाल्यास संस्थेने धनादेशाव्दारे प्रत्येकी ५ हजार विवाह भेट योजनेचा लाभ देण्यात आला असून एकूण ४ लाख ७० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. 

तसेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या सभासद कुटूंब आधार विमा योजने अंतर्गत १३ मयत सभासदांचे वारसास रुपये १५ लाख प्रमाणे १ कोटी ९५ लाख रुपये इतका सभासद कुटूंब आधार विमा योजनेचा लाभ देण्यात आला. अपघात विमा  पॉलीसी १ मयत सभासदांच्या वारसांना १० लाख व एक अवयव कायमचा निकामी झाल्यामुळे ४ लाख रुपये रक्कम एका सभासदास विमा कंपनी कडून देण्यात आली आहे. 

संस्थेच्या सभासदांसाठी सन २०२५-२०२६ या साला करीता वार्षिक १० लाखाची अपघात विमा पॉलीसी घेतलेली आहे. या अहवाल सालामध्ये अपघात विम्या मधून सभासदाच्या वारसास दहा लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. सभासदांचे डिव्हिडंड व व्याजाची रक्कम सभेच्या दुसऱ्या दिवशी सभासदांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याचे उपाध्यक्ष मनिषा साळवे यांनी सांगितले आहे.

संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष गुणवत्ता प्राप्त सभासदांच्या मुला-मुलीना पारितोषिक व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती पॅनल प्रमुख संचालक संजय कडूस यांनी दिली. 

यावेळी संस्थेचे संचालक प्रशांत मोरे, विक्रम ससे, विलास शेळके, अरुण जोर्वेकर, भाऊसाहेब चांदणे, राजू दिघे, दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे,  ज्योती पवार, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, सुरेखा महारनूर, प्रशांत निमसे, संभाजी आव्हाड, व्यवस्थापक राजेंद्र पवार, उप व्यवस्थापक प्रशांत लोखंडे, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post