मुंबई ः सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून वाढ झालेली आहे. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती.
शुक्रवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. २५ एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २५ कॅरेट सोन्याचा दर ९६ हजार ३० रुपये आहे.
२२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८८ हजार २८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९७ हजार ९६० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९८० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
२४ कॅरेट सोने ९९.९ टक्के शुद्ध आहे. २२ कॅरेट अंदाजे ९१ टक्के शुद्ध असते. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९ टक्के इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
Post a Comment