माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची बदली

अहिल्यानगर : अहिल्यानगरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची बदली जळगाव जिल्हा परिषदेत योजना विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही.


३१ मे २०२५ रोजी तीन वर्ष कालवधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केल्या आहेत. बदली रद्द करण्यासाठी कुठल्याही स्वरूपाची आवेदने सादर केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद आहे. ३० मे रोजी काढलेल्या आदेशानुसार २६ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात कडूस यांचीही बदली झाली आहे.

अहिल्यानगरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. माध्यमिक शिक्षण विभागात आता कोण शिक्षणाधिकारी म्हणून येणार यावर चर्चेचा खल सुरू झालेला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post