अहिल्यानगर ः जिल्ह्यात सध्या जनता दरबार भरविले जात आहे. हे जनता दरबारातून प्रसिध्दीचा स्टंट केला जात असून नागरिकांचे प्रश्न कायमच जैसे थेच राहत आहेत. हे जनता दरबार अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी सध्या जनता दरबार भरविले जात आहे. या जनता दरबारात नागरिक घरचे काम सोडून जनता दरबाला हजेरी लावून प्रश्न मांडत आहेत. हे प्रश्न सोडविण्याचे त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आश्वासन देत आहेत.
त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अधिकाऱ्यांना सचूनाही दिल्या जात आहेत. मात्र त्यानंतर ते प्रश्न खरच सुटले की नाही सुटले याची खातरजमा कोणी करीत नाहीत.
जनता दरबारात कामधंदा सोडून नागरिक पोटतिडकीने प्रश्न मांडत आहेत. मात्र ते प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. जनता दरबारात नागरिकांनी किती प्रश्न मांडले किती निकाली निघाले याचा आढावा संबंधित लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे.
मात्र तसा कोणताच आढावा लोकप्रतिनिधींकडून होत नाही. दर महिन्यालाच जनता दरबार भरवून घेतले जात आहे. प्रश्न येत आहेत. परंतु तसेच राहात आहेत. त्यामुळे आता जनता दरबारात तक्रारी घेऊन येणार्यांची संख्या कमी झालेली आहे.
जनता दरबार हे लोकप्रतिनिधींचे प्रसिध्दीचे माध्यम बनले आहे. जनता दरबाराच्या अगोदर व जनता दरबार झाल्यानंतर प्रसिध्दी मिळवत आहेत. परंतु नागरिकांनी किती प्रश्न मांडले की सोडविले. प्रश्न कोण-कोणत्या प्रकारचे होते, याची माहिती लोकप्रतिनिधींनी प्रसिध्द करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Post a Comment