शेवगाव : अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करण्याची घटना शेवगाव शहरात शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपीने चाकूने केलेल्या हल्ल्यात मुलीच्या दंडावर गंभीर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी सल्लाउद्दीन हाशमोद्दीन शेख (वय ३३) याला अटक केली आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास मुस्लिम मैत्रिणीस दुचाकीवर बसून शहरातून जात होती.
यावेळी सल्लाउद्दीन शेख व गुलाम कुरेशी या दोघांनी पीडितेच्या दुचाकीला त्यांची स्कुटी आडवी लावली. स्कुटीचालक मुलगा असल्याचे समजून मुलीस दुचाकीवरून घेऊन जात
असल्याच्या संशयावरून पीडितेवर चाकूने वार केला; मात्र मुलीने डाव्या हाताने प्रतिकार केल्याने दंडावर गंभीर दुखापत झाली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी शेख व कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर घटनेतील आरोपी फरार झाले; मात्र सल्लाउद्दीन हा एका विद्यालयाच्या
परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथकाच्या मदतीने त्यास ताब्यात घेतले.
Post a Comment