अहिल्यानगर : एमआयडीसी परिसरात विनापरवाना फटाके वाहतूक करणाऱ्या इसमावर एमआयडीसी पोलिसांची कारवाई केली. या कारवाईमध्ये सुमारे बत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की निंबळक बायपास रोडवरील लामखेडे पेट्रोल पंपाजवळ गाडी क्रमांक टी एन २९ सी यु १२६६ मध्ये एक इसम सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना ज्वलनशिल पदार्थ सुरक्षित राहील याबाबत योग्य ती दक्षता न घेता वाहतूक करीत आहे.
अशी माहिती मिळाल्याने एमआयडीसी पोलिसांनी पथक तयार करुन सदर ठिकाणी जावून खात्री करता सदर ठिकाणी बातमीतील नमूद वर्णनाचा कंटनेर व टाटा एस कंपनीचा टेम्पो क्रं एम एच १६ सी.डी ५७९२ उभे होते. कंटेनरमधील माल हा टाटा एस कंपनीच्या गाडीत उतरवीत असल्याचे दिसुन आले.
तेव्हा आम्ही सदर कंटेनरजवळ जावून खात्री करता कंटेनरचे केबीन मध्ये एक इसम बसलेला दिसला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरेशकुमार वेलस्वामी असे असल्याचे सांगून तो कंटेनरचा ड्रायव्हर असल्याचे सांगितले. त्यास त्याचे ताब्यातील कंटेनरमध्ये काय माल आहे.
याबाबत विचारपुस करता त्याने अर्धवट माहिती सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचा आम्हास संशय आल्याने आम्ही त्यास कंटेनर मधील माल दाखविण्याबाबत सांगितले असता त्याने कंटेनरचा दरवाजा उघडला असता कंटेनरमध्ये स्फोटक पदार्थ फटाक्याचे बॉक्स असल्याचे दिसले चालक इसम नामे सुरेशकुमार वेलस्वामी यांस कंटनेरमधील मालाचे कागदपत्रांबाबत व सदरचा माल कोठून भरला व कोठे नेत आहे. याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसले बाबत सांगितले.
Post a Comment