पारनेर : राज्यस्तरीय "ब "वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा,तालुका पारनेर,जिल्हा अहिल्यानगर या न्यासाचे रिक्त झालेल्या विश्वस्त पदावर विश्वस्त मंडळाने न्यायप्रक्रियेद्वारे,पारदर्शकपणे विश्वस्त निवड करावी अशी मागणी आता विश्वस्तांनी ही केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन न्यासाचे विश्वस्त जालिंदर खोसे, महादेव पुंडे, धोंडीभाऊ जगताप, दिलीप घुले,यांनी न्यासाचे अध्यक्ष व सचिव यांना पाठविले आहे. कै. राजेंद्र चौधरी यांचे निधनाने रिक्त झालेल्या जागेवर नवीन विश्वस्त निवड करण्यासाठी विश्वस्त मंडळाकडून पारदर्शक, न्यायप्रक्रियेद्वारे विश्वस्त निवड करण्याची मागणी विश्वस्तांनी केली आहे.त् यामुळे न्यासाचे मानकरी, देणगीदार,भाविक भक्त,ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ,अनुभवी अशा सर्वांना प्रक्रियेत येण्याची संधी उपलब्ध होईल.
व्यासाच्या उद्देशामध्ये सन २०१९ मध्ये वाढ करण्यात आली. वैद्यकीय, पर्यावरण, चॅरिटेबल, सामाजिक, शैक्षणिक उद्देशांचा समावेश करण्यात आलेला आहे.त्या कार्यासाठी तज्ञ,अनुभवी व्यक्तींची विश्वस्त पदावर निवड होणे आवश्यक आहे.
त्यासाठी सदर विश्वस्त पदाची जाहिरात वर्तमानपत्रातून देण्यात येऊन,अर्ज मागवून,अनुभवी निवड पॅनल कडून, मुलाखती घेऊन, गुणवत्ता, पात्रता, योग्यता यावर विश्वस्तांची निवड करण्यात यावी.
तसेच अर्जदारांना पोलिस व्हेरिफिकेशन आवश्यक करावे.असे पारदर्शक व न्यायप्रक्रियेचा अवलंब विश्वस्त मंडळाने करण्याची मागणी विश्वस्तांनी पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यमान विश्वस्तांच्या निवडी करताना सन २०२२ मध्ये सहाय्यक धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर यांनी केलेली प्रक्रिया आता विश्वस्त मंडळाकडूनही रिक्त झालेल्या जागेवर विश्वस्त निवडीत अवलंबवावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी उपलब्ध होईल आणि मानकरी, देणगीदार भाविक भक्त यांचेही याबाबतचा,सूचनांचा व भावनांचा आदर राखला जाईल असेही निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment