राहुरीत सशस्र दरोडा... लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविला... तीन जण जखमी.

राहुरी : तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच दरोडेखोरांनी तीन घरांत धाडसी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी घरातील लोकांना धारदार हत्याराने वार करून धाक दाखवत रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने चोरून नेले. 


ही घटना तालुक्यातील वांबोरी येथे गुरुवारी (ता. १९) पहाटे घडली. शिवाजी बाबुराव खरमाळे (रा. वांबोरी, सुभाषनगर) व त्यांचे कुटुंब गुरुवारी रात्री घरात झोपले होते. पाऊस चालू असताना पहाटे एकच्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधून आलेले चार ते पाच दरोडेखोर खरमाळे यांच्या घरात घुसले. 

दरोडेखोरांनी वार करून दहशत केली. त्यानंतर महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले. नंतर दरोडेखोर ११ हजार रुपये रोख रक्कम अन् चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. त्यानंतर पहाटे दरोडेखोर सागर कवाणे यांच्या घराकडे गेले. कवाणे कुटुंब खालच्या मजल्यावर झोपले होते. 

दरोडेखोर वरच्या मजल्यावर गेले आणि तेथे उचकापाचक करून तेथील सुमारे दहा ते वीस हजार रुपये रोख रक्कम व दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यानंतर दरोडेखोरांनी अमोल ज्ञानदेव गडाख यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आणि घरातील रक्कम चोरून नेली. 

या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा त्वरित तपास करून आरोपीला जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post