श्रीगोंदा : श्रीगोंद्यातील त्या शाळेतील शालेय पोषण आहारात त्रुटी आढळून आलेल्या नाही. तसा अहवाल प्रशासनाला सादर झाला आहे. मग कालबाह्य झालेली पाकिटे कशी आढळून आली असा सवाल आता उपस्थित होत आहे.
गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी यांनी दिलेल्या सूचनेनुसार हिरडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा ठुबे यांनी शालेय पोषण आहारातील कालबाह्य झालेले साहित्य नष्ट केले. तसा अहवाल त्यांनी शिक्षण विभागाला दिला.
शालेय पोषण आहार विभागाचे निरीक्षक सत्यजित मच्छींद्र, विस्ताराधिकारी नीळकंठ बोरुडे यांनी हिरडगाव शाळेतील शालेय पोषण आहार, साहित्य व रेकॉर्ड तपासले. यामध्ये कोणतीही त्रुटी आढळलेली नाही.
१६ जून रोजी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी हिरडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहाराचे साहित्य तपासले असता डेडस्टॉकमधील कपाटात कालबाह्य झालेली हळदीची काही पाकिटे आढळून आली. याची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली. त्यानंतर शाळा मुख्याध्यापकांनी पोषण आहार साहित्य तपासून डेडस्टॉक नष्ट केला.
हा डेडस्टाॅक का ठेवला होता. त्याचा वापर पहिल्या दिवशी करण्यात आला होता का यासह अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. डेडस्टाँक ठेवल्या प्रकरणी संबंधितांवर काय कारवाई करणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणावर आता श्रीगोंद्याचे आमदार कसे लक्ष देतात याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
शाळेत डेडस्टाॅक सापडने ही गंभीर बाब आहे. ही शिक्षक मंडळी घरी असेच साहित्य वापरेल की फेकून देईल असा सवाल केला जात आहे.
Post a Comment