श्रीरामपूर : उक्कलगाव येथील ज्येष्ठ नेते, अशोक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात यांना मारहाण करून लुटल्याप्रकरणी अनोळखी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली.
याबाबत इंद्रनाथ थोरात यांनी फिर्याद दिली आहे. ते त्यांच्या वाहनामधून नगरहून उक्कलगावकडे येत असताना नरसाळी परिसरात एका हॉटेल पुढे एकाने ओव्हरटेक करत हात दाखवून थांबवले. आरोपींनी गाडीजवळ येऊन गाडीची चावी काढून घेत झटापट केली.
तू आमच्या गाडीला डॅश मारला', असे म्हणत नुकसानभरपाईची मागणी केली. आमच्या वाहनाने तुमचे नुकसान केले नाही, असे म्हणत असताना एकाने फायटरने थोरात यांच्या डोळ्याजवळ मारले.
यावेळी शिवाजी गंगाधर थोरात व प्रकाश किसन जगधने यांनाही आरोपींनी मारहाण केली. खिशातील ९ हजार रुपये ब्रळजबरीने काढून घेतले. यावेळी थोरात यांच्या गळ्यातील सोन्याची चेन गहाळ झाली.
हल्लेखोर हे मारुती सुझुकी गाडी क्रमांक (एमएच ४२, एक्स ८२७१) या वाहनातून श्रीरामपूरच्या दिशेने पसार झाले, असे इंद्रनाथ थोरात यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एकास अटक करण्यात आली आहे. किरण रावसाहेब साळवे (रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
Post a Comment