जो हिंदूंसाठी काम करेल तोच देशावर राज्य करेल

अहिल्यानगर : आमदार संग्राम जगताप हे जरी या सभेस उपस्थित नसले तरी समोर बसलेला प्रत्येक जण संग्राम जगताप आहे. कारण संग्राम जगताप ही एका व्यक्ती नसून तो एक विचार आहे. याच विचाराने आज प्रत्येकजण हिंदुत्वासाठी काम करत आहे. म्हणून जो माझ्या प्रत्येक संकटात माझ्या मागे उभा असतो त्या माझ्या मित्राला जाहीर समर्थन देण्यासाठी मी आलो आहे. 


या पुढील काळात जो हिंदूंसाठी काम करेल तोच देशावर राज्य करेल अशी भूमिका घेतली पाहिजे. या सभेद्वारे पूर्ण महाराष्ट्रात हा संदेश मी देत आहे. अशीच एकजूट कायम ठेवून हिंदूंची ताकद आमदार संग्राम जगताप यांच्या मागे करा, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.

आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या समर्थनार्थ रविवार सकल हिंदू समाजाचे शहरात मोठे शक्तिप्रदर्शन झाले. माळीवाडा बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ यानिमित्ताने भव्य सभा झाली. या सभेस माजी खासदार डॉ.सुजय विखे, हभप संग्राम भांडारे महाराज, श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग, व राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानचे अविनाश तायडे आदी हिंदुत्ववादी नेते उपस्थित होते. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी व शेकडो हिंदू नागरिक, महिला उपस्थित होते. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

डॉ. सुजय विखे म्हणाले, आ. संग्राम जगताप यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्या दिशेने आता मीही हळूहळू जात आहे. आज जे संग्राम जगताप यांच्या विरोधात मोर्चे काढत आहेत, त्यांना शिव्या देत आहेत कारण संग्राम जगताप यांच्यामुळे आज हिंदू जागा झाला आहे, याचा त्रास आता त्यांना होऊ लागला आहे. हिंदूंच्या महिला, जमिनींना आता सुरक्षित होत आहेत. 

लोकसभा निवडणुकीतील व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी विधानसभा निवडणुकीतून दिले आहे. याचाही त्रास त्यांना होत आहे. ते धर्मनिरपेक्षतेची भाषा करतात. आम्हीही धर्मनिरपेक्ष होण्यास तयार आहोत त्याआधी तुम्ही गोहत्या बंद करा, लव्ह जिहाद बंद करा, आमचे मंदिरांवर ताबे मारणे बंद करा. हे थोतांड आधी थांबवा मगच धर्मनिरपेक्षतेची भाषा करा.

संग्राम भांडारे महाराज म्हणाले, जसा अयोध्येतील राम मंदिराचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागला आहे. तसाच ज्या मंदिरांवर त्यांनी ताबे मारले आहेत त्यांचा ही निकाल लवकरच लागणार आहे. लव्ह, लँड व व्होट जिहाद करत आहेत त्यांनी समजून घ्यावे आता काँग्रेसचे सरकार नाहीये. 

देशात व राज्यात आता हिंदूंच्या विचाराचे सरकार आहे. म्हणून हिंदूंच्या विरोधातील षडयंत्र सहन केले जाणार नाही. येणाऱ्या काळात सर्व आमदार, खासदार व नगरसेवक हे हिंदूच झाले पाहिजे. यासाठी संघटीत व्हा. आ.संग्राम जगताप यांच्या सारखे प्रखर हिंदुत्ववादी आमदार अहिल्यानगर मिळाल्याचा नागरिकांनी अभिमान बाळगत त्यांचे हात बळकट करा, असे आवाहन केले.

यावेळी अविनाश तायडे, अशोक गायकवाड, संजय मरकड, बजरंग मोरे महाराज,भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आदींनी मनोगत व्यक्त करत आ.संग्राम जगताप यांना समर्थन केले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने सभेची सांगता झाली.

माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या मासिक श्राद्धविधी विधीमुळे आ.संग्राम जगताप हे या सभेस उपस्थित नव्हते. तरीही त्यांना समर्थन देण्यासाठी शेकडो युवक, महिला, नागरिक या सभेस उत्स्फूर्तपणे या सभेस उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post