राहुरी : राहुरी पोलिसांनी बनावट नोटांचा पडदा फास्ट केला आहे. 70 लाखांच्या नोटा राहुरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले आहे.
राहुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की तीन इसम हे काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल घेऊन अहिल्यानगर कडून राहुरी कडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत आहे.
पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी लागलीच पोलीस पथकाला सूचना करून राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावून तीन संशयित पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (राहणार सोलापूर) राजेंद्र कोंडीबा चौगुले (राहणार कर्जत जिल्हा अहिल्यानगर) तात्या विश्वनाथ हजारे {रा. कर्जत जिल्हा अहिल्यानगर) यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतल्या असता त्यांच्या अंग झळतील मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा मिळून आल्या.
पोलिसांनी लगेच अॅक्सिस बँक मॅनेजर कैलास वाणी यांना बोलावून सदर नोटा तपासले असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींना अधिक विचारपूस केली असता आरोपींनी शितल नगर टेंभुर्णी येथे समाधान गुरव यांच्या इमारतीत भाड्याने घर घेतलेले असून तेथे मशीन प्रिंटर कटिंग करण्याची मशीन नोटा बनवण्याचा कागद नोटा मोजण्याचे मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोल युनिटवर नोटा बनवत असल्याचे सांगितले. पोलिसांनी तब्बल 70 लाख 73 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment