घोडोगावमध्ये कांदा घसरला...

घोडेगाव : येथील उपबाजार समितीमध्ये शनिवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या भावात घसरण झाली. कांद्यातील भावातील घसरणीला बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा कारणीभूत ठरली.


बाजार समितीत एकूण शनिवारी ५३ हजार तीनशे कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी कांद्याच्या झालेल्या लिलावात एक दोन लॉटला प्रतिक्विंटल सतराशे ते अठराशे रुपये भाव मिळाला तर सरासरी चौदाशे ते सोळाशे रुपये रुपये भाव मिळाला. 

फूल गोळा माल १६०० ते १८००, मुक्कल भारी १४०० ते १६००, गोल्टी ५०० ते ११००, गोल्टा ९०० ते १३०० तर जोड व कमी कलरच्या कांद्याला २०० ते ९०० रुपये असा भाव मिळाला.

बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा परिणाम कांद्यावर झालेला आहे. ही परिस्थिती सुधारल्यानंतर कांद्याला भाव मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कांद्याच्या भावात घसरण झाल्यामुळे कांज्याची आवक कमी झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post