तिरट जुगारावर छापा.... दहाजण ताब्यात...

संगमनेर : जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहे. कोणत्या अधिकारीच्या हद्दीत जर अवैध धंदे आढळून आल्यास संबंधित और कारवाई करण्यात येईल असाही इशारा त्यांनी दिलेला आहे. असे असतानाही जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही अवैध धंदे सुरू आहेत.


दोनच दिवसांपूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली होती.  आज शहर पोलिसांनी जुगाराच्या छापा टाकला आहे.

संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदीच्या किनारी पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या तिस्ट जुगार अड्यावर शहर पोलिसांनी रविवारी (ता.२२) सायंकाळी छापा टाकत दहा जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत पाच लाख अकरा हजाराचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वीच शहरातील दोन ठिकाणी मोठ्या जुगार अड्यांवर कारवाई केली होती. त्यानंतर आता संगमनेर शहर पोलिसांनी तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या पथकाने कारवाई केली..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post