पारनेर ः येथील बाजार समितीत कांद्याचे रविवारी लिलाव झाले. एक नंबर कांद्याला १९०० रुपयांचा भाव मिळाला. पानेर तालुक्यासह शेजाली तालुक्यातून कांद्याच्या १०९१७ गोण्यांची आवक झाली.
कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १८०० ते १९००, दोन नंबर कांदा ः १५०० ते १७००, तीन नंबर कांदा ः ९०० ते १४००, चार नंबर कांदा ः २०० ते ८००, गोल्टी कांदा ः १००० ते १४००
सध्या कांद्याला भाव कमी आहे. आगामी काळात कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आवक जास्त असल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झालेला आहे.
Post a Comment