नेवासा ः घोडेगाव येथील उपबाजार समितीच्या आवारात कांद्याचे लिलाव झाले. नेवासा तालुक्यासह राहुरी, नगर, वैजापूर, गंगापूर आदी तालुक्यातून कांद्याच्या ६६ हजार ८७५ गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १८०० रुपयांचा भाव मिळाला.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः १७०० ते १८००, दोन नंबर कांदा ः १५०० ते १६००, तीन नंबर कांदा ः १३०० ते १४००, गोल्टा ः ९०० ते ११००, गोल्टी ः ६०० ते ७००, जोड कांदा ः २०० ते ६००. अपवादात्मक गोण्यांना १९०० ते २००० रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
कांद्याला १८०० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त केली जात असली तरी आगामी काळात कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Post a Comment