नगर ः येथील नेप्ती उपबाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. यामध्ये एक नंबर कांद्याला दोन हजारांचा भाव मिळाला. आगामी काळात कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगर तालुक्यासह पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातून कांद्याच्या 63398 कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १६०० ते २०००, दोन नंबर कांदा ः १२०० ते १६००, तीन नंबर कांदा ः ६०० ते १२००, चार नंबर ः २५० ते ६००.
कांद्याला चांगला भाव मिळावा, ही प्रत्येक शेतकर्याची अपेक्षा असते. त्यामुळे प्रत्येक शेतकर्यांना कांदा विक्रीस आणता कांद्याची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक मंडळासह सचिवांनी केले आहे.
Post a Comment