अहिल्यानगर : शिक्षकाच्या पेशाला काळीमा फासण्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. शिक्षकाने चौथीत शिकणार्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. विशेष म्हणजे ही घटना उघड झाल्यानंतर त्या शिक्षकाने गावातील एका नेत्याला हाताशी धरून अत्याचार केलेल्या विद्यार्थीनीच्या कुटुंबियांना दमबाजी केल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
पाथर्डी तालुक्यात एका शाळेत परप्रांतीय कामगाराच्या चौथीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. मात्र, ही बाब शिक्षक व गावातील एक नेता दडपत असल्याची चर्चा आहे. याबाबत नागरिकांनी चाईल्ड लाईनकडे तक्रार केली आहे.
शिक्षकाने मुलीसोबत गैरवर्तन केले. यात मुलगी जखमी झाली आहे. मुलीच्या पालकांनी ही बाब गावातील एका नेत्याला सांगितली. पण, या नेत्याने गावात राहायचे असेल तर पैसे घेऊन शांत बसा असे सांगितल्याने हे कुटुंब घाबरून गेले. ही बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी बाब स्नेहालय संस्थेला कळवली. स्नेहालय संस्थेने चाईल्ड लाईनकडे संपर्क करण्याचा सल्ला दिला आहे.
या प्रकरणाचे शिक्षण विभागणी तातडीने दाखल घेऊन संमती शिक्षकावर कारवाई करावी तसेच पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या गावातील त्या नेत्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Post a Comment