अहिल्यानगर : स्पर्धेच्या युगात नवनवीन अभ्यासक्रम नवीन प्रणाली शिक्षण क्षेत्रात येत असून या काळात विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची भीती कमी करून मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतून विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम होऊन त्यातून स्पर्धा परीक्षांना सहकार्य घडेल असे गौरोदगार अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी काढले .
मंथन वेल्फेअर फाउंडेशन आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी पाटील बोलत होते ते पुढे म्हणाले की अहिल्यानगर जिल्हा परिषद राबवत असलेल्या मिशन आरंभ या पथदर्शी उपक्रमाद्वारे जिल्हा परिषद शाळांचा पट आणि गुणवत्ता झपाट्याने वाढत आहे .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीष मोडक होते .
मंथन वेल्फेअर फाउंडेशन सातत्याने ग्रामीण व शहरी भागात राज्यस्तरावर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना राज्य पातळीनुसार स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर दर्जेदार साहित्य पुरवून परीक्षेद्वारे गुणवत्ता शोधण्याचे काम करते .
या कार्यक्रमासाठी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे ,या वर्षीचे यूपीएससी पात्र ओंकार खुंटाळे, शिक्षणाधिकारी योजना बाळासाहेब बुगे ,हृदयरोग तज्ञ डॉ.अभिजीत पाठक, लेखापरीक्षण सहाय्यक संचालक रमेश कासार ,राज्य कर निरीक्षक प्रदीप कुमार रोहोकले ,अर्जुन दारकुंडे ,पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश तांबे ,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरिता खोसे, विस्तारधिकारी जयश्री कार्ले आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमासाठी अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील चमकदार कामगिरी करणाऱ्या राज्यस्तरीय 390 व जिल्हास्तरीय 555 पुरस्कारांची वितरण मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले .
यापुढेही दर्जेदार संदर्भ साहित्य, सरावसंच याद्वारे महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांची गुणवत्ता शोधून त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी करण्यासाठी मंथन परिवार कटिबद्ध असल्याचे मत मंथनचे संचालक किशोर गोरे सचिन नरसाळे यांनी व्यक्त केले .
पालकांनी आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा यश अपयश हे आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मुलांवर लादू नये आपल्या पाल्यांनी मिळवलेले यश पालकांनी आपले स्टेटस सिम्बॉल बनवणे चुकीचे असल्याचे मत मुख्य वित्त व लेखाधिकारी शैलेश मोरे यांनी व्यक्त केले !
Post a Comment