सीताराम सारडा विद्यालयातील मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना हिंद सेवा मंडळाने १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करावे

अहिल्यानगर : हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयामध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत असणाऱ्या मुस्तकीन तनवीर शेख याची २५ जून रोजी शाळेत दुर्दैवी हत्या झाली. मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत सांत्वन पर भेट घेतली. या भेटी नंतर हिंदू सेवा मंडळाकडे लेखी पत्राद्वारे मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. 


जिल्हा पोलिस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त यांना लेखी निवेदन देत विविध मागण्या काळे यांनी केल्या आहेत. मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची काळे यांनी भेट घेत संवाद साधला. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. 

यावेळी सुनील भोसले, विलास उबाळे, सचिन भालेराव, विनोद शिरसाट, विकास भिंगारदिवे, किशोर कोतकर, यासीर शेख, दानिश शेख, समीर शेख, सिकंदर शेख, तन्वीर शेख, सोनू शेख, अलीम शेख, तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते. काळे म्हणाले,  घडलेली घटनाही अत्यंत धक्कादायक असून यामुळे संपूर्ण शहर हे भयग्रस्त झाले आहे. 

या घटनेमुळे, विशेषत:, सदर विद्यालयात शिकणाऱ्या अन्य विद्यार्थी - विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांच्या मनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. याचे लोन शहरातील अन्य शाळांपर्यंत देखील पोहोचले आहे. 

एकूणच सर्वच पालक हे आपण मुलांना शाळेत पाठवतो खरं, परंतू मुलं शाळेत सुरक्षित आहेत काय ? या विचारामुळे चिंतेत आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे बाल गुन्हेगारीकरण होणे ही समाजासाठी अत्यंत घातक बाब असल्याची चिंता यावेळी त्यांनी व्यक्त केली. 

किरण काळे यांनी हिंद सेवा मंडळावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. काळे म्हणाले, एवढी मोठी घटना घडल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष, सचिव किंवा एकही ट्रस्टी मयत कुटुंबियांच्या घरी साधा भेटी साठी सुद्धा फिरकलेला नाही. विचारपूस केलेली नाही. 

शाळेतील शेकडो विद्यार्थी, पालक, शिक्षक इतर कर्मचारी घडल्या प्रकारामुळे प्रचंड तणावा खाली असताना संस्थेच्या मानद सचिवांनी घटनेनंतर स्वतःचा वाढदिवस श्रीरामपूर येथे गाजत वाजत साजरा केला. यासाठी संस्थेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना श्रीरामपूरला बोलावून घेण्यात आले. या प्रकरणाची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी चौकशी करत संस्था चालकांवर कारवाई करावी, अशी जाहीर मागणी काळेंनी केली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post