शिक्षकांच्या संघटनेत फूट?..नाराजांची विरोधी गटाशी चर्चा...

अहिल्यानगर : राज्यातील राजकीय समीकरणे मागील तीन वर्षांपासून जशी बदलली आहे. तशीच समीकरणे आता जिल्ह्यातील शिक्षक संघटनात बदलत चालली आहे. शिक्षकांच्या संघटना बांधणीत काहींना पद मिळतील अशी आशा होती. परंतु आशेची निराशा झाली आहे. 


नाराज नेतेमंडळी आता विरोधकांच्या गोटात जावून चर्चा व बैठका करीत आहे. त्यामुळे विद्यमान पदाधिकार्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे. विद्यमान पदाधिकार्यांवरही नारामंडळी नाराजी व्यक्त करीत आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या राजकारण चांगलेच तापलेले आहे. हे तापलेले वातावरण वरून शांत दिसत असलेले तरी चांगलेच तापलेले आहे.  या तापलेल्या वातावरणाची शिक्षकांमध्ये चांगली चर्चा झडत आहे. 

नेते मंडळीचा सेवानिवृत्ती कालावधी जवळ येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांना  नेतृत्वाची संधी मिळेल अशी आशा होती. परंतु नेते मंडळींनी दुसर्या फळीतील नेत्यांना पुढे अद्याप येऊ दिलेले नाही. त्यामुळे नाराज झालेली मंडळी दुसर्या गोटात जाऊन मिळत आहे. 

काहींच्या रात्रीच्या बैठका सुरू आहेत. या बैठका अनेक दिवसांपासून सुरू असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे. या चर्चेची भनक नेत्यांनाही लागली आहे. परंतु ठोस काही हाती नसल्याने नेतेहीफक्त बघ्याच्या भूमिकेत आहे.

बँकेची सर्वसाधारण सभा रविवारी होत आहे. त्यामुळे शिक्षक संघटनातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तापलेल्या वातावरणात संघटनांमधील वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहे. 

पद न मिळाल्याने नाराज आलेल्यांचे संकट नेत्यांपुढे कायम असताना विद्यमान पदाधिकार्यांच्या कामकाजावर ज्येष्ठ मंडळी नाराज असल्याची चर्चा सध्या शिक्षकांमध्ये सुरू आहे.  या नाराजीतून चूक झाली यांना संधी दिली. नव्याला संधी दिली असती तर संघटना बांधणी चांगली झाली असती असे नेते बोलत आहे. त्यामुळे शिक्षकांमधील चर्चेला उधाण आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post