अहिल्यानगर ः शहराचे नामांतर झालेले असताना व शिक्षकांप्रमाणे शिक्षकेतर संस्थेचे सभासद असल्याने सोसायटीचे नामांतर अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर सहकारी सोसायटी असे नामकरण करण्याचा ठराव संतोष कानडे यांनी मांडला. या ठरावाला सर्वांनी मंजुरी दिली.
जिल्ह्यातील सुमारे 11 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासद यांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची 82 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. 22 वर्षाच्या सत्ताबदलनंतर स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचे सत्ताधारी संचालक मंडळाच्या या पहिल्याच वार्षिक सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
या सभेला उपाध्यक्ष अर्जुन वाळके, संचालक बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, सुनील दानवे, उमेश गुंजाळ, राजेंद्र कोतकर, सुधीर कानवडे, संभाजी गाडे, किशोर धुमाळ, आप्पासाहेब जगताप, बालाजी गायकवाड, छबु फुंदे, साहेबराव रकटे, शिवाजी लवांडे, बाजीराव अनभुले, अतुल कोताडे, विजय पठारे, सुरज घाटविसावे, वर्षा खिलारी, वैशाली दारकुंडे, उद्धव सोनवणे, सचिन जाधव, सोसायटीचे सचिव स्वप्निल इथापे आदी उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी जिल्हा सहकारी मंडळाच्या व्ही.ए. मानकर यांनी कार्यशाळा घेऊन उपस्थितांना सहकार खात्यातील विविध तरतुदी, कलमांची माहिती व कायदे संदर्भात मार्गदर्शन केले. अध्यक्षीय सूचना संचालक महेंद्र हिंगे यांनी मांडली. सुनील दानवे यांनी त्याला अनुमोदन दिले. अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
सचिव स्वप्निल इथापे यांनी मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. संस्थेच्या कामकाजाविषयीचा अहवाल वाचून मंजूर करण्यात आला. संचालक बाबासाहेब बोडखे यांनी ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचे वाचन करुन पारदर्शक पध्दतीने कारभार करण्यासाठी ऑडिट रिपोर्ट सर्व सभासदांपुढे मांडण्यात आला असल्याचे सांगून ऑडिटरचा खर्च देखील कमी केले जाणार असल्याची सांगितले. तसेच 2 कोटी 47 लाख रुपये गुंतवणुक करुन राबविण्यात येत असलेल्या उत्तम जिंदगी या योजनेची माहिती दिली.
सभासदांपैकी देविदास खेडकर यांनी उत्तम जिंदगी सभासदांसाठी फायद्याची कशी? व ऑडीटर खर्चा संदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावर चेअरमन शिंदे यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार ही योजना अमलात आणली आहे. सुधारित एनपीए, कर्जावर तरतूद, या योजनेतील सर्व रक्कम व्यवहारात राहणार असल्याची माहिती दिली. तर ऑडिटरचा 10 लाखांनी खर्च कमी करण्यात आला आहे. यापुढे देखील हा खर्च कमी करुन ते पुढील अहवालात सभासदांना दिसणार असल्याचे सांगितले.
उद्धवराव गायकवाड यांनी या सभेत बाउन्सरला तोंड न देता सहजपणे व्यासपीठावर सभासदांना आपले मत मांडता आल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले. तर संस्था स्थापन केलेल्या संचालकांच्या माहिती अहवालात नमूद करण्याचे सूचना केल्या. भाऊसाहेब जिवडे यांनी सोसायटीत ऑनलाइन पेमेंट व्यवस्था करण्याची सूचना मांडली. भीमराज खोसे यांनी कमीत कमी खर्चात ऑडिट रिपोर्ट करण्याचे व अमोल क्षीरसागर यांनी कर्जाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी केली.
चेअरमन शिंदे यांनी या सूचनांवर सकारात्मकता दर्शविली. तर पुढच्या वेळेस जास्त लाभांश देण्याचे व कर्ज वाढ करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रामराव धनवटे, रामदास जंजिरे, इस्माईल शेख, संदीप पानमळकर, गणेश विखे आदींनी सभेत प्रश्न उपस्थित करून विविध सूचना मांडल्या. या प्रश्नांना संचालक मंडळाच्या वतीने समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
याप्रसंगी माजी संचालक बाळासाहेब राजळे, सुरेश मिसाळ, ज्ञानेश्वर काळे, बाळासाहेब सोनवणे, कल्याण ठोंबरे, सत्यवान थोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर कानवडे यांनी केले.
Post a Comment