वांबोरीत कांद्याच्या ६१३३ गोण्यांची आवक.... नेप्तीत किती मिळाला कांद्याला भाव पहा...

राहुरी ः  राहुरी तालुक्यातील वांबोरी उपबाजार समितीत सोमवारी कांद्याचे लिलाव झाले. एक नंबर कांद्याला १७०० रुपयांचा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. राहुरी तालुक्यासह नेवासा काही गावातून तालुक्यातून कांद्याच्या ६१३३ कांदा गोण्यांची आवक झाली. 


कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः  १३०५ ते १७००, दोन नंबर कांदा ः ८०५ ते १३००, तीन नंबर कांदा ः १०० ते ८००, गोल्टी कांदा ः ५०० ते १०००. अपवादात्मक ५६ कांदा गोण्यांना १७०५ ते १८०० रुपयांचा भाव मिळाला.  

शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणल्यास कांद्याला चांगला भाव मिळतो. त्यामुळे प्रत्येक कांदा उत्पादकाने कांद्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आलेले आहे. 


नेप्तीत उपबाजारमध्ये कांद्याला अवघा १६०० रुपयांचा भाव

अहिल्यानगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात सोमवारी कांद्याचे लिलाव झाले. या लिलावात एक नंबर कांद्याला अवघा १६०० रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नगर तालुक्यातून कांद्याच्या ४६२३१ कांदा गोण्यांची आवक झाली. 

कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १२०० ते १६००, दोन नंबर कांदा ः ८०० ते १२००, तीन नंबर कांदा ः ४५० ते ८००, चार नंबर ः २०० ते ४५०. 

शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणल्यास कांद्याला चांगला भाव मिळतो. त्यामुळे प्रत्येक कांदा उत्पादकाने कांद्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आलेले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post