अहिल्यानगर ः अहिल्यानगर तालुक्यातील बाराबाभळी गावातील सेवानिवृत्त सैनिकावर लाकडी दांडक्याने व धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अनिल मधुकर कवडे (वय ४१, रा. बाराबाभळी) असे जखमी सेवानिवृत्त सैनिकाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांनी दिलेल्या जबाबावरून भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष भानुदास कवाडे (रा. बाराबाभळी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. फिर्यादी हे काही कारणास्तव संतोषच्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, संतोष घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनिल तिथून परत फिरले.
परंतु, थोड्याच वेळात संतोष तिथे आला आणि त्याने अनिल याच्यावर अचानक लाकडी दांडक्याने हल्ला केला. डोक्यावर जोरदार मार बसल्याने अनिल जमिनीवर कोसळले. त्यानंतर संतोषने धारदार शस्त्राने त्यांच्या पोटावर, छातीवर आणि पाठीवर वार केल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे.
Post a Comment