घोडेगावमध्ये गोल्टा कांद्याला सर्वाधिक १२०० रुपयांचा भाव... श्रीरामपूरमध्ये कांद्याला मिळाला अवघा किती भाव पहा वाचा मग...

नेवासा ः नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजार समितीच्या आवारात सोमवारी कांद्याचे लिलाव झाले. घोडेगावमध्ये कांद्याच्या ४२१०७ गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १६०० रुपयांचा भाव मिळाला. घोडेगाव बाजार समितीत नेवासा तालुक्यासह


नगर तालुक्यासह राहुरी व गंगापूर तालुक्यातून कांद्याची नेहमीच आवक होत असते.  
कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १४०० ते १६००, दोन नंबर कांदा ः १२०० ते १४००, तीन नंबर कांदा ः १००० ते ११००, गोल्टा ः १००० ते १२००, गोल्टी ः ६०० ते ७००, जोड कांदा ः २०० ते ५००. 

शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणल्यास कांद्याला चांगला भाव मिळतो. त्यामुळे प्रत्येक कांदा उत्पादकाने कांद्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आलेले आहे. 

श्रीरामपूरमध्ये कांद्याला अवघा १७०० रुपयांचा भाव

श्रीरामपूर ः येथील बाजार समितीच्या आवारात सोमवारी कांद्याचे लिलाव झाले. कांद्याच्या २५१४३ गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १७०० रुपयांचा भाव मिळाला.  

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव - एक नंबर कांदा ः १४०० ते १७००, दोन नंबर कांदा - १००० ते १३५०, तीन नंबर कांदा ः ५०० ते ९५०, खाद ः २०० ते ४५०, गोल्टी कांदा ः १००० ते १४००.  

मोकळ्या कांद्याची ७६ वाहनातून आवक

मोकळा कांद्याची ७६ वाहनातून आवक झाली.  कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांद्याला ११०० ते १३५०, दोन नंबर कांद्याला ः ८०० ते ११००, तीन नंबर कांद्याला ः ५०० ते ८००, गोल्टी कांद्याला ः ८०० ते ११०० रुपायंचा भाव मिळाला.

शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणल्यास कांद्याला चांगला भाव मिळतो. त्यामुळे प्रत्येक कांदा उत्पादकाने कांद्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आलेले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post