अहिल्यानगर ः राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात सन २००५ पासून कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या अधिकारी तसेच कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषद अहिल्यानगर समोर बेमुदत काम बंद आंदोलन करत आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत समायोजनाबाबत होत असलेल्या विलंबासाठी शासन निर्णय नुसार दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन करणे बाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. परंतु सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे.
राज्यपाल महाराष्ट्र राज्य विधिमंडळ २०२५ या वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात मुद्दा क्रमांक ५२ नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार त्यांना आरोग्य सेवेतील मान्यता व प्राप्त सर्व कक्ष पदावर सामावून घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते परंतु अभिभाषणामधील या निर्णयाच्या अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांना दहा टक्के मानधनवाढ व रॉयल्टी बोनस लागू करावा ग्रॅज्युटी तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे मानधन १५५०० पेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांनाही ईपीएफ ची योजना लागू करण्यात यावी.अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्य बजावत असताना अपघात मृत्यू झाल्यास रुपये ५० लाख सानुग्रह अनुदान लागु करावे तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पंचवीस लाख सानुग्रह अनुदान मिळावे-अपघात झाल्यास दोन ते पाच लाख औषध उपचारासाठी सानु ग्रह अनुदान मिळावे.
आशा स्वयंसेवक व गटप्रवर्तक यांचे सानुग्रह अनुदान पत्र नुसार ५ मार्च २०२५ तसेच ज्या पद्धतीने अंगणवाडीतील कर्मचारी यांना गट विमा लागू करण्यात आला आहे त्या धर्तीनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी कर्मचारी व कर्मचारी यांनाही गट विमा लागू करण्यात यावा- सोळा सतरा वर्षापासून अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनात २५ टक्के वाढ करण्यात . समुदाय आरोग्य अधिकारी यांची रुपये २५००० मानधन व पी बी आय रुपये १५००० हे वेगळे न करता एकत्रित रुपये चाळीस हजार मानधन अदा करावे.
समुदाय आरोग्य अधिकारी यांचे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दहा वर्षाची अट शिथिल करून समायोजन धोरण लागू करावे- विभागनिहाय रिक्त जागा अधिकृतपणे जाहीर कराव्यात ग्रामविकास विभाग डीएमईआर नगर विकास आरोग्य विभाग या विभागांच्या पदभरती जाहिरात प्रसिद्ध करणे पूर्वी १४ मार्च २०२४ शासन निर्णय प्रमाणे कर्मचारी व अधिकारी यांचे समायोजन करण्यात यावे- दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक मूल्यमापन अहवाल व त्या आधारे पुनर्नियुक्ती प्रक्रिया बंद करावी.
एकूण ६९ संवर्गापैकी फक्त २ स्वर्गाची समायोजन झाले. बाकी तांत्रिक अतांत्रिक अधिकारी कर्मचारी यांच्या समायोजनासाठी खूप विलंब होत आहे अशा विविध स्वरूपाच्या मागण्यांसाठी १० व ११ जुलै रोजी आझाद मैदानावर आंदोलन करून आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन सुद्धा वरील मागण्या मान्य होत नसल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांनी पुकारलेल्या १९ ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी, बेमुदत काम बंद आंदोलनात तसेच जिल्ह्यातील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी एकत्रीकरण समिती जिल्हा अहिल्यानगर यांच्या मार्फत कंत्राटी कर्मचारी आंदोलनात बहुसंख्येने सहभागी झालेले आहे. निवेदनावर राष्ट्रीय सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री. आरोग्य मंत्री जिल्हाधिकारी साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले आहे.जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
Post a Comment